ऊसतोड कामगार पुरवतो असे सांगून ठेकेदाराची पाच लाख पाच हजार रुपयाची फसवणूक केल्या प्रकरणी दोघा जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वैभव राघू पाठक (वय - 35 वर्ष रा. कुकडी कॉलनी ,पराग कारखाना ,रावडेवाडी ता. शिरूर जि. पुणे. ) यांनी फिर्याद दिली आहे.
रवी मूलचंद पवार अविनाश मूलचंद पवार ( दोन्ही रा. हनुमान खेडा ता. चाळीसगाव ,जि.जळगाव)यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती २०
ऑक्टोबर २०२२ ते आजपर्यंत फिर्यादी यांनी ऊसतोड कामगार पुरवण्यासाठी ५ लाख ५ हजार रुपये फोन पे व रोख मुकादम रवि मुलचंद पवार व अविनाश मुलचंद पवार उचल दिली होती. त्यानंतर 20 ऑक्टोबर 2022 रोजी कारखाना चालू होण्याच्या वेळी पवार यांच्याकडे यांचेकडे उसतोड कामगार मिळणेबाबत विचारणा केली असता त्यांनी मला उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. कारखाना सुरू होवुन सिझन बंद झाला तरी मी वेळोवळी उसतोड कामगारांची मागणी करूनही मला रवी पवार व अविनाश पवार यांनी उसतोड कामगार दिले नाहीत. त्यामुळे माझे लक्षात आले की, रवि मुलचंद पवार व अविनाश मुलचंद पवार यांनी माझे कडून पैसे घेवून मला उसतोड कामगार न पुरविता माझी फसवणूक केली आहे. 2022 ते आज पर्यंत पवार यांच्याकडे घेतलेली रक्कम परत द्या अशी मागणी करूनही आजपर्यंत त्यांनी माझी रक्कम न दिल्याने पवार दोन्ही भावांनी माझी फसवणूक केली असल्याची लक्षात आले.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार अनिल आगलावे करीत आहे.