मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासह विवीध मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू असून त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी सामजिक कार्यकर्ते सावळाराम आवारी, सामजिक कार्यकर्ते अनिल डांगे आज दिनांक २८ जानेवारी पासून आमरण उपोषण सुरु केले आहे.
मराठा आरक्षणासाठी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी २५ जानेवारी २०२५ व पासून आंतरवाली सराटी येथे सहकाऱ्यांसह सामूहिक आमरण उपोषण सुरू केले आहे.
यावेळी मराठा समाजाच्या नेत्या शोभानाताई पाचंगे ,पत्रकार,मराठा समाजाचे अध्यक्ष सतिश धुमाळ, सामजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज, अविनाश घोगरे, सुदाम चव्हान राजू शेख मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आरक्षण घेण्यासाठी आम्ही आता माघार घेणार नाही , असे आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे यांनी सांगितले आहे.
मराठा समाजाचा घटक म्हणून समाजाचा आम्ही काही तरी देणे लागतो या भावनेतून आम्ही सुद्धा २८ जानेवारी पासून तहसिल कार्यालय आवारात उपोषणास सुरू केले असून आरक्षण मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अनिल डांगे यांनी सांगितले.
गेली अनेक वर्ष राज्य शासन मराठा समाजाला खेळवत असून आरक्षण देण्यासाठी सक्षम नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सावळाराम आवारी यांनी केली आहे.
*प्रमुख मागण्या*
- सगेसोयरेची अंमलबजावणी करावी
- मराठा आंदोलकांवर दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत
- हैद्राबाद, सातारा, बॉम्बे गव्हर्नमेंट, औंध संस्थानचे गॅझेटिअर्स लागू करावे
- आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या मराठा बांधवांच्या कुटुंबियांना दिली जाणारी आर्थिक मदत सरकारने बंद केली आहे. ती सुरु करावी व कुटुंबातील एका सदस्याला प्रशासकीय सेवेत रुजू करून घ्यावे
- स्व.संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निष्पक्षपातीपणे तपास करून सर्व आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी.
- तसेच स्व. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.
या मागण्या मान्य कराव्या अशी आंदोलनकर्त्यांची मागणी आहे.