शिरूर दिनांक प्रतिनिधी
शिरसगाव काटा शिरूर येथील जमिनीतून अवैध उत्खनन करून दोनशे ब्रास मुरूम किंमत दोन लाख 66 हजार दोनशे रुपयाचा चोरी नेल्याप्रकरणी दोघा जणांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत प्रमिला नागेश वानखेडे (वय ४२ वर्षे रा. तक्षशिला सोसायटी, बिल्डींग पुणे ) महसूल अधिकारी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी सोनबा कोळपे , धनंजय काळे( दोघे रा.शिरसगाव काटा ता.शिरुर जि.पुणे) यांच्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरील किमतीचे मुरूम अज्ञात इसमाने स्वतःचे आर्थिक फायदयासाठी शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशिरपणे चोरी करून चोरून नेले आहे. मी सदरबाबत माहिती घेतली असता सदरचे उत्खनण हे मौजे शिल्सागाव काटा ता. शिरूर जि. पुणे येथील सोनबा कोळपे व धनंजय काळे यांनी केले असल्याचे समजले आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 25 जानेवारी 2025 रोजी 4वाजून 10 मिनिट पुर्वी शिरसागय काटा ता. शिरूर जि. पुणे येथील जमिन गट नं. 650 यामधील 200 ब्रास मुरूम किंमत २ लाख ६६ हजार रुपये सोनबा कोळपे, धनंजय काळे (दोघे रा. शिरसगाव काटा ता. शिरूर जि. पुणे) यांनी स्वतःचे आर्थिक फार्यव्यसाठी शासनाची कोणतीही परवानगी न घेता चोरी करून चोरून नेले आहेत, म्हणनु माझी त्यांचे विरूध्द भा. न्याय, संहीता कलम 303(2), 3(5) सह खान व खनिज विकास व विनीयमन अधिनीयम 1957 चे कलम 4 (अ), पर्यावरण संरक्षण अधिनीयम कलम 9,15, सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनीयम 1984 चे कलम 3,4 प्रमाणे सरकारतर्फे रितसर तक्रार आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे करत आहे.