शिरूर - पुणे महामार्गावर चार चाकी वाहनांमध्ये एक ते दोन प्रवासी असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून वाहतूक कोंडीचे हेच प्रमुख कारण आहे. यावर प्रशासनाने दिवसआड सम विषम नंबरच्या गाड्यांना एन्ट्री किंवा एका चारचाकी (कार, जीप) वाहनात किमान चार लोक असा नियम करून या भागातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा.... येथील 3 मजली किंवा आठपदरी रस्ता केव्हा होईल हे देवजाने कारण पुणे जिल्ह्यातील राजकारण्यांना केवळ भ्रष्टाचार करणे हाच एकमेव मार्ग त्यांचा आहे. अन्यथा गेल्या 15 वर्षापासून या रस्त्यावर होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्न त्यांनी सोडवला असता परंतु त्यांची ही मानसिकता नाही असेच म्हणावे लागेल.
नगर पुणे किंवा पुणे नगर हा महामार्ग आहे या महामार्गावर चौपदरी रस्ता असून पुणे जिल्ह्यात चारचाकी वाहनांचे प्रमाण मोठे आहे. त्यात मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने ही आहे. आता पुणे जिल्ह्यातील माणूस महिला असो किंवा पुरुष वाहनांशिवाय फिरत नाही सायकलींचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक वाहनांनी प्रवास करत आहे.
पुणे नगर व पुणे शहर हे आता वाहनांचे माहेरघर झाले आहे. चालणारी माणसे कमी व मुंग्यांसारखी चालणारी वाहने जास्त अशी विचित्र परिस्थिती पहावयास मिळेल.
पुणे जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचा असणारा हा महामार्ग या महामार्गावर लोणीकंद पासून ते रांजणगाव गणपतीपर्यंत मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण झाले आहे. तर पुण्यात आयटी कंपन्यांमध्ये, शासकीय कार्यालयांमध्ये काम करणारे कामगार वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात वाघोली, लोणीकंद, कोरेगाव भीमा, शिक्रापूर, रांजणगाव गणपती येथे घरे घेतली आहे.
तर शिरूर शहरापासून ते वाघोली पर्यंत अनेक सहकारी कार्यालयामध्ये काम करणारे कंपन्यांमध्ये काम करणारे कामगार शिरूर पुणे यारस्त्याने ये जा करत आहे.
या भागात राहणारे अनेक लखोपती लोक हे पुण्यात राहण्याचा असून त्यांचा व्यवसाय वाघोली पासून शिरूर शहरापर्यंत आहे. त्यांची सकाळी संध्याकाळी दुपारी येजा असते. तसेच शिरूर शहर ते वाघोली पर्यंत अनेक व्यापाऱ्यांच्या खरेदीचे ठिकाण पुणे शहर आहे त्यांची ही रोज येजा असते.
परंतु पुणे या ठिकाणी जाणारे सरकारी, खाजगी कंपनीचे कर्मचारी , अनेक उद्योजक हे सर्वजण राहण्यास वाघोली ते शिरूर दरम्यान रहातात. सर्वजण चार चाकी गाडी घेऊन पुण्याला जात असतात. परंतु हे सर्वजण चार चाकी गाड्या घेऊन पुण्याला ये जा करत असतात. या चारचाकी वाहनांमध्ये 70 टक्के वाहने ही एक ते दोन लोक असलेली असतात तर दहा टक्के वाहने तीन ,तर 20 टक्के वाहने तीन ते चार लोक घेऊन जात असतात. त्यामुळे 70 टक्के वाहनेही एक ते दोन लोक असणारे असल्याने मोठ्या प्रमाणात पुणे शहरांमध्ये जाणाऱ्या चार चाकी वाहनांची संख्या आढळून येत आहे.
त्यात हजारो कामगार कर्मचारी शाळकरी मुले ही दुचाकी गाड्यांवर पुण्याकडे व पुण्यावरून नगरच्या दिशेने जात असतात. या सर्वांमुळे पुणे नगर रस्त्यांची मुंग्यासारखी वाहने झाली आहे. हे सर्वात मोठे कारण असून, पुणे नगर रस्त्यालगत अतिक्रमण तर काढलेच पाहिजे... परंतु सर्वात मोठी समस्या म्हणजे वाहनांमध्ये असणाऱ्या लोक व वाहनांची संख्या तपासणी गरजेचे आहे.
जर शासनाला ही शक्य नसेल तर पुणे शिरूर रस्त्यावर चारचाकी वाहनांचे शेवटचा नंबर सम व विषम नंबर अशा गाड्या सोडवणे गरजेचे आहे किंवा वाहनात कमीत कमी चार लोक असणे गरजेचे आहे. अशा उपाय योजनाच वाहतुकीची कोंडी सोडू शकेल हे माञ खरे.... अन्यथा रोजचे मडे त्याला कोण रडे...