शिरूर येथे आयोजित प्रोफेशनल्स प्रीमियर लीग २०२४ चा प्रथम क्रमांकाचा मानकरी शिरूर पोलीस इलेव्हन संघ ठरला तर द्वितीय क्रमांकाचा मानकरीटीम इंजिनियर संघ ठरला असून तृतीय क्रमांकाचा मानकरी एच आर एन कमर्शियल संघ ठरला आहे. सर्व विजेता संघांना मालाची ट्रॉफी व रोख रक्कम देण्यात आली.
२५ ते २९ डिसेंबर २४ या कालावधीमध्ये रयत शाळा मिनी स्टेडियम, शिरूर येथे या स्पर्धेचे आयोजन डॉ . प्रविण गायकवाड यांनी केले होते. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते.
स्पर्धेचे उद्घाटन शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते करण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभ आयएएस अधिकारी मणिपूरचे जिल्हाधिकारीअभिजीत पठारे यांच्या हस्ते करण्यात आला.तर मंत्रालयाची संधी अधिकारी प्रवीण शिशुपाल, पुणे व शिरूर चे प्रसिद्ध डॉक्टर निखिल पानसरे, प्रमोद गायकवाड,,
सिद्धार्थ चाबुकस्वार (होलमिल बेकर्स), मायकल पॉल (रुबी हॉल शिरूर), सुभाष गांधी,गांधी कन्स्ट्रक्शन, आनंद क्षीरसागर (प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ) शरद पवार (हॉटेल कल्याणी), प्रितेश कोठारी (महावीर इलेक्ट्रॉनिक्स),संदीप करंजुले (हॉटेल रस्सा भाकरी), जेसल सेठ शहा (शहा ज्वेलर्स), अमित दादा कर्डिले ( मिनरली वॉटरयावेळी उपस्थित होते.
या पर्वामध्ये १६ संघ सहभागी झाले होते. यामध्ये शिरूर मधील ११ तर शहराबाहेरील ५ संघ सहभागी झाले होते. स्पर्धेची वैशिष्ट्ये चार प्रेक्षक गॅलरी, उत्कृष्ट समालोचक, नामांकित पंच, व युट्युब लाईव्ह करण्यात आले होते.
या स्पर्धेसाठी मुंबई मंत्रालयाची कार्यस्थान अधिकारी प्रवीण शिशुपाल यांनी विशेष सहकार्य केले आहे.
तर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक डॉ.निखिल पानसरे
द्वितीय पारितोषिक डॉ संकेत घोडे , डॉ प्रवीण महाजन सर (सुखायु हॉस्पिटल)
तृतीय पारितोषिक डॉ रवीन बोरा व वैभव खाबिया ( नम्रता ज्वेलर्स)
चतुर्थ पारितोषिक - एडवोकेट प्रशांत दसरे ( नोटरी, भारत सरकार).
प्रथम पारितोषिक विजेते पोलीस इलेव्हन
31,000 रुपये व चषक,द्वितीय पारितोषिक विजेते - टीम इंजिनियर्स 25,000 रुपये व चषक ,तृतीय पारितोषिक विजेते - एच आर अँड कमर्शिअल
21,000 रुपये व चषक ,चतुर्थ पारितोषिक विजेते - रायजिंग स्टार डॉक्टर्स क्रिकेट क्लब, शिरूर.
15,000 रुपये व चषक
मालिकावीर - सुदाम खोडदे (पोलीस इलेव्हन)
उत्कृष्ट फलंदाज - विशाल अलभर (टीम इंजिनियर्स)
उत्कृष्ट गोलंदाज - विशाल गायकवाड ( टीम इंजिनियर्स)
अंतिम सामन्याचा सामनावीर - संतोष पठारे ( पोलीस इलेव्हन)
या सर्व खेळाडूंना मानाची ट्रॉफी व रोख रक्कम देण्यात आली.
फन, फिटनेस, फ्रेंडशिप* हे आपल्या स्पर्धेचे ब्रीदवाक्य आहे. ज्या प्रोफेशनल व्यक्ती कधीतरी क्रिकेट खेळत होत्या, परंतु आता कामाच्या व्यापामुळे खेळता येत नाही. त्या सर्व व्यक्तींसाठी ही स्पर्धा आपण दरवर्षी भरवत आहोत. खेळता खेळता स्वतःचा फिटनेस तसेच कुटुंबाचाही फिटनेस सर्वांनी राखणे महत्त्वाचे असून ,हा संदेश आपण सर्वांना देत असल्याचे आयोजक डॉक्टर प्रवीण गायकवाड यांनी सांगितले.