शिरूर प्रतिनिधी
रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दीन हा साजरा केला जातो,या दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधव यांना राज्यस्तरीय निर्भिड पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला शिरूर च पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते सर्व पत्रकार बंधू यांना ट्रॉफी व पुष्गुच्छ देऊन राज्यस्तरीय निर्भिड पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
लोकशाहीचा चौथा आधास्तंभ म्हणून पत्रकार यांचा कडे पाहिले जाते. समाजात अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचे,चांगल्या गोष्टींना प्रसिध्दी देण्याचे काम पत्रकार बांधव करत असतात,त्यांचा कामाचे कौतुक व्हावे,त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना आज जो पुरस्कार दिला.तो योग्य आहे.त्या बद्दल अध्यक्षा राणी कर्डिले यांचे आभार मानतो.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिते कडे पाहिले जात आहे समाजातील वाईट गोष्टी समाजासमोर आणण्याचे काम पत्रकार करत असतो परंतु समाजात व शासकीय कार्यालयात असणारे चांगल्या गोष्ट समाजासमोर आणण्याचे काम
पत्रकार करत असतात असे सांगून पोलीस नेहमीच तुमचा सोबत आहेत,सर्व पत्रकार यांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिल्या.
यावेळी पत्रकार खरच समाजाचा आधार स्तंभ असून त्यांचे महत्वाचे स्थान आहे,त्यांचा गौरव केला त्याबद्दल रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या आभार,पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सामाजिक कार्यकर्ते बापू सानप यांनी दिल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या शोभनाताई पाचंगे, नेते शामकांत वर्पे, गीता आढाव,शितल शर्मा, डॉ.वैशाली साखरे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य शंतुन भैय्या खांडरे,पत्रकार तेजस फडके,निलेश काळे,प्रमोद लांडे यांचे मिळाले.
यावेळी पोलीस निरीक्षक