शिक्रापूर ता. शिरुर येथून चोरलेल्या कार पुन्हा आणून लावलेल्या

9 Star News
0
शिरूर 
( प्रतिनिधी ) कोरेगाव भीमा विजयस्तंभ येथे संभाजीनगर व सोलापूरहून अभिवादन साठी आलेल्या अनुयायांच्या दोन कार शिक्रापूर येथील पोलीस बंदोबस्तात असलेल्या पार्किंग मधून चोरीला गेल्याच्या घटना घडल्याने याबाबत शिक्रापूर पोलिसांत कार चोरीबाबत गुन्हा दाखल असताना दोन दिवसांनी चोरी केलेल्या दोन्ही कार अज्ञातांनी पुन्हा त्याच ठिकाणी आणून लावल्याच्या घटना घडल्या मात्र सदर घटनेने शिक्रापूर पोलीस देखील चक्रावून गेले आहे.
                        कोरेगाव भीमा विजयस्तंभ येथे १ जानेवारी रोजी संभाजीनगर हून पद्माकर हिवराळे हे त्यांच्या ताब्यातील एम एच २० एफ जि ७११६ या स्विफ्ट तर सोलापूर हून सुर्यकांत गायकवाड हे त्यांच्या ताब्यातील एम एच ४३ आर ६९३३ या इनोव्हा कार मधून आपल्या सहकाऱ्यांसमवेत आलेले असताना त्यांनी त्यांच्या कार शिक्रापूर येथील जित हॉटेल समोरील पार्किंग मध्ये लावून ठेवत येथून शासकीय बसने अभिवादन स्थळी गेले होते, दुपारच्या नंतर पुन्हा पार्किंग मध्ये आले त्यावेळी कार चालक पद्माकर हिवराळे व सुर्यकांत गायकवाड या दोघांना त्यांच्या कारची चावी त्यांच्या कमरेला नसल्याने दिसल्याने त्या दोघांनी कारची पाहणी केली असता दोन्ही कार चोरीला गेल्याचे समोर आले, याबाबत पद्माकर नामदेव हिवराळे वय ३७ वर्षे रा. सहारा परिवर्तन सोसायटी जळगाव रोड संभाजीनगर व सुर्यकांत मुकिंद गायकवाड वय २८ वर्षे रा. गणेशनगर ता. सोलापूर जि. सोलापूर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करत तपास सुरु केला दरम्यान शिक्रापूर पोलिसांचे वेगवेगळे पथक परिसरातील सीसीटीव्ही तपासात कार चोरीचा तपास करत असताना ३ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास सदर जित हॉटेल समोरील पार्किंग मध्ये दोन नंबर नसलेल्या कार उभ्या असल्याबाबत पोलिस स्टेशन मध्ये फोन आला आणि पोलीस पार्किंग कडे जाताच चक्रावून गेले कारण पोलीस ज्या कार चोरीचा तपास करत होते त्या दोन्ही कार तेथे उभ्या असल्याचे दिसले, तर पोलिसांनी दोन्ही कार ताब्यात घेतल्या असून पोलिसांना अशा पद्धतीने चोरीची झलक दाखवणाऱ्या चोरट्यांचा पोलीस हवालदार गणेश करपे व बापू हाडगळे यांसह आदी पोलीस शोध घेत आहे.
फोटो खालील ओळ – शिक्रापूर ता. शिरुर येथून चोरलेल्या व पुन्हा आणून लावलेल्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कार.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!