शिरूर विधानसभा निवडणूक 2029 मध्ये जय मल्हार क्रांती संघटना ही शिरूर तालुक्यात भारतीय जनता पार्टी महायुतीकडे विधानसभा उमेदवारी मागणार असून, पाच वर्षाच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे आणणार आहे. त्याच्या माध्यमातूनच माझी उमेदवारी राहील असा विश्वास राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ,जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दौलत शितोळे यांनी व्यक्त केला आहे.
या अगोदरच्या लोकप्रतिनिधींनी खुंची राजकारण केले आहे तसे राजकारण या काळात होणार नाही.शिरूर तालुक्यात औद्योगिक वसाहत परिसरात राजकीय फायदा घेत काहीजण खुनशी राजकारणातून एकमेकांचे ठेके घेण्यासाठीच मग्न असून, असा प्रकार यापुढील काळात खपवून घेतला जाणार नाही. कोणाच्याही पोटावर पाय देण्याचे काम कार्यकर्त्यांनी करू नये अन्यथा त्यास महायुतीच्या वतीने विरोध करण्यात येईल असा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दौलत शितोळे यांनी दिला आहे.
शिरूर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दौलत शितोळे बोलत होते.
शिरूर तालुक्यातील गुणाट शिंदोडी या रस्त्याचे काम मागील आमदार यांनी केवळ हा रस्ता शिंदोडीला माझ्या गावाला जातो म्हणून अडवला होता. परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या रस्त्याचा प्रस्ताव दिला असून लवकरच या रस्त्याचे काम चालू होईल असे सांगून शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा, उरळगाव, शिंदोडी, चिंचणी, इनामगाव, न्हावरे या परिसरातील विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली आहे या भागातील कामे विद्यमान आमदार माऊली कटके, महायुतीतील सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते यांना घेऊन शिरूर तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शितोळे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री सहायता निधी गरजू रुग्णांना लगेच मिळावा यासाठी न्हावरा या ठिकाणी पोर्टल सुरू करणार आहे या पोर्टलच्या माध्यमातून शिरूर तालुक्यातील गरजू रुग्णांना तात्काळ मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर महायुतीचा घटक पक्ष म्हणून महायुतीचे काम केले आहे . राज्यात सत्ता येताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठीवर शाब्बासकीची थाप मारली असून, जय मल्हार क्रांती संघटनेची कौतुक केले आहे.
यापुढील काळामध्ये जय मल्हार क्रांती संघटनेमध्ये सर्व जाती धर्मांच्या लोकांचा समावेश करून अनेक समाजाचे संघटना जय मल्हार क्रांती या संघटनेमध्ये आपल्या संघटना विलीन केले असल्याचे शितोळे यांनी सांगितले असून सर्व समाजाला या संघटनेत योग्य स्थान दिले जाणार असले तर त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तीन पक्ष व त्यांना साथ देणारे सर्वच घटक पक्ष त्यात जय मल्हार क्रांती संघटना ही असून निवडणुकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्वच कार्यकर्त्यांची कौतुक केले आहे. तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीही कौतुकाची थाप दिली आहे.
शिरूर तालुक्यातील सर्वच अधिकाऱ्यांची भेटी घेऊन त्यांना शिरूर तालुक्यातील नागरिकांची कुठलीही कामे मुद्दामहून आणून ठेवू नका मग तो कुठल्याही पक्षाचा असू द्या. परंतु अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांना जमत नसेल तर बदली करून घ्यावी असेच सांगणार असून,सर्वांची कामे झाली पाहिजेन, वृद्ध महिला नागरिकांनाही हेलपाटे मारू नये हा या मागचा हेतू असल्याचे दौलत शितोळे यांनी सांगितले.