शिरूर येथे तरुणावर जीवघेंना हल्ला करून फरार झालेला आरोपीला शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिले असून त्याला शिरूर प्रथमवर्ग न्यायालयाने 22 जानेवारी पर्यंत पोलिस कस्टडी दिली आहे.
आयान समीर शेख (रा. फकीर मोहल्ला शिरूर जिल्हा पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
सैफ जमीर खान (वय २२ वर्षे, रा. भाजी बाजार, शिरूर, ता. शिरूर, जि. पुणे ) हा याहल्ल्यात गंभीर जखमी झाला होता.
याबाबत असिफ खान यांनी फिर्याद दिली होती
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक २४ डिसेंबर रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी याचा पुतण्या सैफ खान हा शहरांतर्गत पुणे नगर रस्त्यावर पोस्ट समोरील त्यांच्या नाझ कार डेकोरेटर या दुकाना समोर बसलेले असताना. आरोपी आयान समीर शेख हातात धारदार कोयता घेऊन आला व त्यांनी त्याच्यावर पाठीमागून डोक्यात हातावर मानेवर वार करून फरार झाला होता, या प्रकरणी या अगोदर हुसेन शहा याला अटक करण्यात आली होती तर गेल्या महिन्यापासून समीर शेख हा प्रमुख आरोपी फरार होता. याबाबतची गंभीर दखल घेत शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी स्थानिक तपास पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना या गुन्ह्याचा आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले होते.
याबाबत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना पोलीस पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आरोपी आयान समीर शेख हा तासगाव जिल्हा सांगली येथे आहे. सदर बातमीच्या आधारे तांत्रीक विश्लेशन करून तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार विजय शिंदे, निरज पिसाळ हे तासगाव जिल्हा सांगली येथे आरोपीताचा शोध घेणेकामी गेले असता आरोपी आयान शेख हा तेथुन फरशी बसवण्याचे कामानिमीत्त उंब्रज ता कराड जि सातारा येथे गेलेबाबत माहीती मिळाली. सांगली येथुन
पोलीस पथक उंब्रज या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी एसटी स्टँड जवळ सापळा रचला यावेळी आरोपी त्या ठिकाणी आला असता त्याला पोलीस पथकाने पकडले .
सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, पुणे विभाग अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अमंलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, विनोद काळे, नितेश थोरात, सचिन भोई, निखील रावडे, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली आहे. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.