अण्णापूर ता. शिरूर येथे भर रस्त्यात धारधार कोयता हातात घेऊन आरडाओरडा करीत दहशत माजवणाऱ्या मायाभाईला पोलीसांनी अटक केली आहे.
याबाबत अजय हरिश्चंद्र पाटील पोलीस कॉन्स्टेबल शिरूर पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे.
गोविंद शरद जगताप उर्फ माया भाई (वय 36 वर्ष राहणार अण्णापूर ता. शिरूर) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक १७ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी पोलीस ठाणे हददीत पेट्रोलींग करत असताना पोलिस ठाणे अंमलदार वारे यांना एका इसमाने फोन करून कळविले की, एकजण अण्णापूर गावात हातात कोयत्या सारखे हत्यार घेवून जोर जोरात आरडाओरडा करत दहशत माजवत आहे. त्यामुळे रस्त्याने जाणारे येणारे लोक घाबरत आहेत. हा प्रकार फिर्यादी यांना ठाणे अंमलदार यांनी सांगितला व मला म्हणाले की सदर ठिकाणी जाऊन व्यक्तीस ताब्यात घ्या, असे सांगून मला सदर ठिकाणी खाना केले. त्यानंतर मी व पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार निखिल रावडे व दोन पंचांसह असे अण्णापूर ठिकाणी जावून मायभाई याला अटक केली.त्याच्या हातातील धारधार कोयता जप्त करण्यात आला आहे.
याबाबात पोलीस कर्मचारी यांनी फिर्याद दिली दिल्याने
त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नाथ साहेब जगताप करीत आहे.