सादलगाव ता. शिरूर येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी धुडगूस ११ लाख ९१ हजारांचा ऐवज नेला चोरुन

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी
     सादलगाव ता. शिरूर येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी धुडगूस घातला असून, दोन घराचे कडी-कोयंडा तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा एकूण ११ लाख ९१ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला असून याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे घरपोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       याबाबत नंदकुमार भगवान जठार (वय ५४, रा. सादलगाव) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे सादलगाव येथे फिर्यादी पत्नी, आई व बहिणीसह सादलगाव येथे राहतात. त्यांचा गुऱ्हाळाचा व्यवसाय असून, सध्या तो बंद आहे. सोमवारी गुऱ्हाळ सुरु करायचे असल्याने त्यांनी बँक खात्यांमधून दोन लाख रुपये घरात आणून ठेवले होते. सोमवारी रात्री नऊ वाजता जेवण करून ते झोपायला गेले. दरम्यान मध्यरात्री एक वाजता खडखड केल्याचा आवाज येत असल्याने त्यांनी उठून खिडकीपाशी येऊन पाहिले. यावेळी त्यांना बाहेर कोणी दिसले नाही. तसेच, बाजूच्या बंद खोलीमधून कपाट तोडल्याचा आवाज आला. त्यामुळे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरवाजा बाहेरून बंद केल्याचे त्यांच्या लक्षात आले. भाऊ राजेंद्र जठार यांना फोन करून त्यांनी घरामध्ये अडकल्याचे सांगितले. भाऊ आल्यानंतर त्यांची सुटका केली त्यांनी बाजूच्या खोलीची पाहणी केली. यावेळी दरवाजाचा कडी व कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोनेचे दागिने एकूण किंमत ६ लाख ६१ हजार ७८० रूपये व कपाटात ठेवलेली दोन लाख रुपयांचे रोख रक्कम असा ८ लाख ६१ हजार ७८० रुपयांचे दागिने असा ऐवज चोरुन नेला आहे.
तर सादलगाव येथील दुसऱ्या घटनेत शेजाऱ्याच्या घरी झोपण्याकरीता गेलेल्या झुंबरबाई गणपत साळुंखे (वय ७०) या महिलेच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने 
घरातली सोन्याचे दागिने असा
१ लाख ८५ हजारांचे सोन्याचे दागिने, ४५ हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला आहे.
 याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंतराव गिरी हे करीत आहेत.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!