शिरूर शहर व तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस शिरूर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांचें हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, शिवसेना तालुका प्रमुख पोपट शेलार, शहरप्रमुख संजय देशमुख, विजया टेमगिरे, शैलजा दुर्गे, खुशाल गाडे, दिनकर पाडळे,पप्पू गव्हाणे,महादेव कडाळे, संतोष गव्हाणे संतोष पवार, माणिक गव्हाणे, राजेंद्र चोपडा, श्रेणिक नहार, एकनाथ गायकवाड, विशाल जोगदंड, उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संदेश केंजळे म्हणाले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार नेहमीच समाजाला नवी दिशा देणारे होते.
यावेळी तालुकाप्रमुख पोपट शेलार म्हणाले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आजही कट्टर शिवसैनिक ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करत असून समाजाच्या प्रत्येक घटकाच्या अडीअडचणीला शिवसेना सर्वात पुढे उभी असते हीच शिकवण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली आहे.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हा सल्लागार विजया टेमगिरे म्हणाल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कार्य व काम संपूर्ण देशाला प्रेरणादायी होते त्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न भारत सरकारने द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.