; शिरूर पोलीस स्टेशच्या तपास पथकाची आणखी एक धडाकेबाज कामगिरी
शिरूर शहरात मध्यवर्ती ठिकाणीं व्यापाऱ्यांवर पिस्तूल रोखून गोळीबार करणाऱ्या तरुणाला शिरूर पोलिस स्टेशनच्या तपास पथकाने आठ तासाच्या आत अहिल्यानगर येथून जेरबंद करून त्याच्याकडून एक पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली lआहे.
कृष्णा वैभव जोशी (रा.सरदार पेठ शिरूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक २० जानेवारी २५ रोजी रात्री साडे नऊ वाजता आरोपी कृष्णा याने सरदार पेठ येथे व्यापारी महेश बोरा याच्यावर इन्कम टॅक्स येथे अर्ज केला असल्याचा कारणावरुन त्याच्यावर बंदूक रोखुन
खुनाचा प्रयत्न केला होता त्यानंतर आरोपी फरार झाला होता. आरोपीचा शोध घेत असता तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांना गोपनिय बातमिदराकडून माहिती मिळाली की आरोपी कृष्णा वैभव जोशी हा अहिल्यानगर बसस्थानकावरून जोधपुर, राजस्थान येथे जाणार आहे. त्याअनुषंगाने तांत्रिक विश्लेषन व बातमीदारांमार्फत माहीती घेवुन तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांची तपास पथके अहिल्यानगर जिल्हयामध्ये खाना झाली होती. तपास पथकांनी अहिल्यानगर बसस्थानकावर सापळा लावुन आरोपी त्याठिकाणी येताच त्यास शिताफिने ताब्यात घेतले त्याच्याकडुन एक पिस्तूल एक जिवंत काडतूस असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
त्याला शिरूर प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता २४ जानेवारी पर्यंत पोलिस कस्टडी मिळाली आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अमंलदार विनोद काळे, सचिन भोई, विजय शिंदे, निरज पिसाळ, नितेश थोरात, निखील रावडे, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली आहे पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.