कोंढापुरी ता. शिरुर येथील एका महिलेवर श्रावण पालोदकर याने केलेल्या अत्याचाराबाबत पिडीत महिलेला केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी श्रावण पालोदकर याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली असता काही दिवसांनी श्रावण जामिनावर बाहेर आलेला असताना त्याने पिडीत महिलेला पुन्हा रस्त्यात अडवून महिलेची छेडछाड करत महिलेले त्याच्या विरुद्ध दाखल केलेली अत्याचाराची तक्रार मागे घेण्यासाठी महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन करत दमदाटी केली, घडलेल्या घटनेबाबत महिलेने पुन्हा शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी श्रावण गणपतराव पालोदकर वय ४५ वर्षे रा. पावारहाऊस जवळ कोंढापुरी ता. शिरुर जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार किरण निकम या करत आहे.
कोंढापुरीत तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला दमदाटी
जानेवारी ११, २०२५
0
कोंढापुरीत तक्रार मागे घेण्यासाठी महिलेला दमदाटी
Tags