शिरूर
( प्रतिनिधी ) पिंपले जगताप ता. शिरूर येथील सुजित कुलकर्णी हा चाकण येथील कंपनीत कामाला असल्याने हो कंपनीत गेलेले होता, दुसऱ्या दिवशी सुजित घरी आला नसल्याने त्याच्या पत्नीने मोबाईल वर संपर्क केला असता संपर्क देखील झाला नसल्याने त्याच्या पत्नीने कंपनीत जाऊन चौकशी केली मात्र सुजित कंपनीत नसल्याचे समजले, दरम्यान सुजितचा सर्व नातेवाईक व मित्रांकडे शोध घेतला असता तो कोठेही मिळून आला नाही, याबाबत सुजितची पत्नी वैभवी सुजित कुलकर्णी वय २२ वर्षे रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे हिने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली, बेपत्ता सुजितचे वर्णन य्च्न्ही पाच फुट दहा इंच, रंग गोरा, मध्यम बांधा, उभट चेहरा, काळे केस, अंगात निळ्या रंगाचा शर्ट व पांढऱ्या रंगाची प्यांट असे वर्णन असून याबाबत शिक्रापूर पोलिसांशी ८६००४२०७९५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गायकवाड हे करत आहे.
सोबत – बेपत्ता सुजित कुलकर्णीचा फोटो.