माहेर संस्था तृतीयपंथिंसाठी हक्काचे घर उभारणारमाहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन

9 Star News
0
माहेर संस्था तृतीयपंथिंसाठी हक्काचे घर उभारणार
माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन 
शिरूर 
( प्रतिनिधी ) माहेर संस्थेच्या माध्यमातून अनेक निराधार बालक, महिला जेष्ठ नागरिकांचे पुनर्वसन होत त्यांना हक्काचे घर मिळालेले असून आता माहेर संस्था समाजातील दुर्लक्षित तृतीयपंथिंसाठी हक्काचे घर उभारणार असल्याचे प्रतिपादन माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन यांनी केले आहे.
                  वढू बुद्रुक ता. शिरूर येथे माहेर संस्थेच्या वतीने आयोजित तृतीयपंथी सन्मान मेळाव्यात बोलताना माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन बोलत होत्या, याप्रसंगी माहेर संस्थेच्या अध्यक्षा हिराबेगम मुल्ला, सावली फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. आम्रपाली मोहिते, महालक्ष्मी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा लखन पूजारी, माहेर संस्थेचे व्यवस्थापक रमेश दुतोंडे, ताराचंद खंडागळे, प्रकाश कोठावळे, आनंद सागर, विजय तवर, सुशील पोहेकर, प्रसेंजित गायकवाड, शिलानंद अंभोरे, मीना भागवत, सागर बावरे, विनायक गाडे, स्वाती पाटील, समीक्षा मुळे, तेजस्विनी पावर, नेहा पोहेकर यांसह आदी उपस्थित होते, याप्रसंगी तृतीयपंथिंच्याहस्ते दिपप्रज्वलन करत सर्व तृतीयपंथिंचा सन्मान करण्यात आला, दरम्यान सावली फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. आम्रपाली मोहिते व महालक्ष्मी सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा लखन पूजारी यांनी माहेर संस्थेच्या कार्याचा गौरव करत समाजात तृतीयपंथी व्यक्तींना स्थान नसून अनेक जण बेघर व दुर्लक्षित असल्याने त्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली तर यावेळी बोलताना माहेर संस्था लवकरच तृतीयपंथी व्यक्तींसाठी हक्काचे घर उभारून तृतीयपंथिंना समाजात प्रतिष्ठा मिळवून देत त्यांना व्यसनापासून दुर करण्यासह त्यांना हक्काचा रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे देखील माहेर संस्थेच्या संस्थापिका लुसी कुरियन यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहेर संस्थेचे व्यवस्थापक रमेश दुतोंडे यांनी केले तर हिराबेगम मुल्ला यांनी आभार मानले.
फोटो खालील ओळ - वढू बुद्रुक ता. शिरूर येथील माहेर संस्थेत तृतीयपंथिंसाठी आयोजित कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी व मान्यवर.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!