( प्रतिनिधी ) ढमढेरे ता. शिरूर येथे मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे तळेगाव ढमढेरे ता. शिरूर येथील एका मोठ्या सोसायटीमध्ये राहणारी युवती घरात मोबाईल पाहत असताना तिच्या वडिलांनी युवतीला पकडून तिच्याशी अश्लील वर्तन करत अत्याचाराचा प्रयत्न करु लागले त्यावेळी युवतीने प्रतिकार केला असता नराधम वडील तिला मारहाण करु लागले, त्यामुळे युवतीने आईला आवाज दिल्याने युवतीची आई घरामध्ये आली त्यावेळी तिने घडणारा प्रकार पाहत युवतीला वडिलांपासून सोडवत असताना नराधम इसामने युवतीच्या आईला देखील मारहाण केली, याबाबत पीडित युवतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी नराधम इसमावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहे.