७६वा प्रजासत्ताक दिन शिरूर शहरात ध्वजारोहण सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर गीत संविधान गीत यासह विवीध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा मुख्यकार्यक्रम शिरूर तहसीलदार कार्यालय पार पडला. तर शाळा क्रमांक चार विद्यार्थी यांनी शिरूर नगरपरिषद येथे सादर केलेले संविधान गीताने उपस्थितांची मने जिंकली.
शिरूर तहसीलदार कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीत झाल्यानंतर भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान अशा घोषणा देण्यात आल्या.
त्यानंतर शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने पथसंचलन करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे शिरूर तहसीलदार कार्यालय यांच्यावतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत करून चहा नाष्टा करण्यात आला.
शिरूर नगर परिषदेचे ध्वजारोहण मुख्याधिकारी अमित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. शिरूर येथील हुतात्मा स्मारकाजवळ ध्वजारोहण माजी शिक्षक संपत लोखंडे यांचे हस्ते करण्यात आले .
शिरूर पोलीस स्टेशन येथील ध्वजारोहण पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या हस्ते, सिटी बोरा कॉलेज येथील ध्वजारोहण शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम यांच्या हस्ते, शिरूर ग्रामीण रुग्णालय अधीक्षक तुषार पाटील यांच्या हस्ते, शिरूर पंचायत समिती येथील ध्वजारोहन पंचायत समिती गट विकास अधिकारी महेश डोके यांच्या हस्ते, वनविभाग कार्यालय येथे परिक्षेत्र अधिकारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक एक येथे शिरूर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी प्रीतम पाटील यांच्या यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक उपस्थित होते. शिरूर नगर परिषद शाळा क्रमांक चार व सहा येथे माजी विद्यार्थी अथरव धेंडे, आरूष धेंडे यांचें हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, यावेळी मुख्याध्यापक संजय वाघ, श्रीमती उबाळे, शिक्षक अशोक मानमोडे,नगरपरिषद उर्दू शाळा क्रमांक तीन येथे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शिरूर नगरपरिषद शाळा क्रमांक पाच येथे सामाजिक कार्यकर्त्या सविता बोरुडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक साळुंखे उपस्थित होत्या. शिरूर प्रमाणिक मुलींच्या शाळेत ज्येष्ठ पत्रकार प्रवीण गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
आझाद सोशल फाउंडेशन, हलवाई चौक मित्र मंडळ येथे उद्योजक संदिप बिहानी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, शिवसेना शाखा क्रमांक 2 यासह शहरातील विविध संस्था-संघटनांनी मंडळांनी ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. शिरूर हुतात्मा स्मारक येथे प्रा . संपत लोखंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्था शिरूर या ठिकाणी आज प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यावेळी किशोर राजे निंबाळकर माजी अध्यक्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी व्यवस्थापक शिवाजीराव पडवळ डी फार्मसी चे प्राचार्य डॉक्टर अमोल शहा बी फार्मसी चे प्राचार्य बाहेती शाळेच्या मुख्याध्यापिका मारिया साठे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स प्राचार्य सतीश पोटे व नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य शितल बर्डे उपस्थित होते