शिरूर शहरात शेजारी राहणाऱ्या महिलेचा पाठलाग करत तिला शिवीगाळ दमदाटी करून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमनाथ चिकने (रा. शिरूर, ता शिरूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक ८ जानेवारी ते २२ जानेवारी
15 दिवसापासुन शिरूर शहरात फिर्यादी घरातून मेडीकल मध्ये जात येत असताना वेळोवेळी शेजारी राहाणारा सोमनाथ चिकने याने पाठलाग करून फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले असून, याबाबत त्याच्या भावाकडे तक्रार केली असताना आरोपी दीपक यांनी 20 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता फिर्यादी मेडिकल मधून घरी जात असताना बरमेचा बिल्डिंगचे जिन्यामध्ये थांबवून तू माझ्या भावाला फोन करून का सांगितले असे म्हणून फिर्यादी शिवीगाळ दमदाटी करत अंगाशी झटापटी केली त्यानंतर पुन्हा 22 जानेवारी रोजी मेडिकल समोर येऊन तू माझी वाटोळे केले असे म्हणत शिवीगाळ केली आहे.
याबाबत फिर्यादीवरून शिरूर पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार उमेश भगत करीत आहे.