शिरूर शहरात वृद्ध नागरिकांना गाठून त्यांच्या खिशातील रक्कम लांब होणाऱ्या अट्टल चोरट्याला शिरूर पोलीस स्टेशनच्या पोलिस पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने पकडले आहे.
मंगेश आलटु भोसले (वय १९ वर्ष, रा. पाण्याची टाकीजवळ शिरूर ता शिरूर जि पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबात किसन रामचंद्र बोडरे (रा. गुजरमळा शिरूर ता शिरूर जि पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी किसन बोडरे विद्याधाम शाळेत जवळून पायी जात असताना आरोपी मंगेश याने फिर्यादी यांना धक्का देऊन त्यांचा हात पकडून त्यांच्या खिशातील रोख रक्कम व मोबाईल फोन घेऊन जात असताना स्थानिक तरुणांनी त्याला पाहिले व शिरूर पोलिसांना याबाबत माहिती देऊन तात्काळ पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व पोलीस पथक तेथे येऊन स्थानिक तरुणांच्या मदतीने आरोपीला पाठलाग करून गुजर मळा परिसरात एका ठिकाणी लपलेला असताना पोलीस व स्थानिक तरुणांनी त्या ठिकाणी सापळा रचून आरोपीला पकडले.
सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले पोलीस निरीक्षक संदेश केंजळे सारे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमाने, पोलीस हवालदार विनोद मोरे, नाथसाहेब जगताप, पोलीस अमंलदार विजय शिंदे, नितेश थोरात, विनोद काळे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, अजय पाटील, स्थानिक पत्रकार अभिजीत आंबेकर, बजरंग दलाचे अजिंक्य तारू, सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव यांचेसह पोलीस पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिवाजी बनकर करीत आहे.