२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.
शिरूर पोलीस स्टेशन येथे 26 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान श्रेष्ठ दान ही सामाजिक बांधिलकी जपून शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरासाठी शिरूर शहर व शिरूर तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून रक्तदान करावे व देशाच्या रक्तदान या महाकार्यात योगदान द्यावे असे आवाहन शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी केले आहे.