शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

9 Star News
0
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
        शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी येते आज बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे त्यामुळे पिंपळसूटी येथील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असले तरी हा बिबट्या नरभक्षक आहे का? असा सवालही उपस्थित होत आहे.
       परंतु वन विभाग व नागरिकांमध्ये हा बिबट्या मांडवगण व पिंपळसुटी येथील नर भक्षक आहे का ? याबाबत द्विधा मनस्थिती आहे. याबाबत सर्व प्रकारच्या चाचण्या पकडलेल्या बिबट्याच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून केल्या जातील त्यानंतर हा बिबट्या नरभक्षक आहे का हे सिद्ध होईल.
      पिंपळसुटी येथे मृत रक्षा निकम या मुलीवर हल्ला आल्यानंतर तब्बल 16 दिवसांनी वन विभागाच्या हाती एक बिबट्या लागला आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत असून बिबट्यांची संख्या ही जास्त आहे. वन विभागाच्या वतीने पिंपळसूटी गावच्या बाजूने एकूण 14 ते 15 पिंजरे बिबट्या पकडण्यासाठी लावले होते. परंतु बिबट्या पिंजऱ्यात जेरबद होत नव्हता त्यामुळे वन विभाग चिंतेत पडले होते. मांडवगण ते पिंपळसूटी या दोन गावांमध्ये तीन चिमुकल्यांचा बळी बिबट्याने घेतला. लहान मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याने या भागातील नागरिक वन विभागावर नाराज आहे. वन विभागही त्यांच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करत आहे परंतु बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होत नव्हता.
        शिरूर तालुक्यातील पिंपळसूटी येथे दिनांक 23 डिसेंबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान रक्षा निकम या पाच वर्षीय मुलीवर अंगणात खेळत असताना बिबट्याने झडप मारून तिला उचलून नेले होते त्यानंतर तिच्या मृतदेह दोन भागात आढळला होता. त्यामुळे या भागातील नागरिक संताप्त व दुःखी झाले होते. या भागातील बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी येथील नागरिक यांनी केली होती. त्यानंतर वन विभागाने या ठिकाणी १४ पिंजरे लावली होते.
         ज्या ठिकाणी रक्षा निकम तिच्यावर बिबट्याने हल्ला केला होता त्या ठिकाणाहून चारशे मीटर अंतरावर हा बिबट्या जेरबंद झाला आहे. या बिबट्याचे वय दोन ते अडीच वर्ष असून, त्याला माणिक डोह बिबट्या निवारण केंद्रात सोडण्यासाठी नेण्यात आल्याचे वनपाल भानुदास शिंदे यांनी सांगितले.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!