शिरूर पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी ओवी निलेश पवार ची शालेय राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्ण झेप

9 Star News
0
ओवी निलेश पवार ची शालेय राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत सुवर्ण झेप
शिरूर प्रतिनिधी
    भोपाळ मध्य प्रदेश येथे सुरू असलेल्या शालेय राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत शिरूरच्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी ओवी निलेश पवार १४ वर्षे वयोगटातील १० मी पीपसाईट एयर रायफल प्रकारात सुवर्णपदक मिळवले आहे.
          दिनांक १ जानेवारी ते ७ जानेवारी २०२५ दरम्यान भोपाळ मध्य प्रदेश येथे सुरू असलेल्या शालेय राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये भारतातून एकूण ३३ राज्यांतील एकूण ११८८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला. 
       या स्पर्धा ओपन साईट रायफल, पीपसाईट रायफल व एअर पिस्टल या 3 खेळ प्रकारात संपन्न झाल्या. त्या स्पर्धेमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूल शिरूर ची ओवी निलेश पवार हिने महाराष्ट्र राज्य संघाचे १४ वर्षे वयोगटातील १० मी पीपसाईट एयर रायफल खेळ प्रकारात महाराष्ट्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र संघाला सुवर्णपदक मिळवून दिले . ती सध्या श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेतील युनिक शूटिंग स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये श्री शरद तरटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एक वर्षापासून सराव करत आहे .
शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय राजेंद्रजी जासूद ,पोद्दार इंटरनॅशनल पब्लिक स्कूलचे प्राचार्य नीरज राय ,संभाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श राजेंद्रजी थिटे , मेजर शहाजी पवार आदी मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले तसेच पुढील स्पर्धेकरता शुभेच्छा दिल्या..

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!