प्रजासत्ताक दिनानिमित्त शिरूर नगर परिषद शाळा क्रमांक एक मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

9 Star News
0

प्रजासत्ताक दिनानिमित्त शिरूर नगर परिषद शाळा क्रमांक एक मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
शिरूर प्रतिनिधी
शिरूर नगरपालिका शाळा क्र. 1 येथे आज सकाळी ७.४५ वाजता मुख्याधिकारी प्रितम पाटील  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
      कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्फूर्तिदायक समूह गीताने झाली. यानंतर संविधानावर आधारित पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश दिला. यासोबतच संगीतमय लेझीम व सांस्कृतिक नृत्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

      मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे कौतुक करताना म्हणाले प्रशासत्ताक दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊन देशातील विविधता व सांस्कृतिक बरोबर सामाजिक सलोखा जपला असल्याचे सांगितले.
 शाळेचे मुख्याध्यापक उषा वेताळ,संपदा राठोड,प्रतिभा आहेर,राजू लांघी, सचिन जाधव व सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाला पालक आणि नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!