आर. एम. धारीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरूरचे स्नेहसंमेलन दिमाखादार... उत्साहात संपन्न...

9 Star News
0
आर. एम. धारीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल, शिरूरचे स्नेहसंमेलन दिमाखादार... उत्साहात संपन्न...
 शिरूर,प्रतिनिधी 
    छत्रपती शिवाजी महाराज काळातील सुभेदार तानाजी मालुसरे यांचा गड आला पण सिंह गेला इतिहास...झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा इतिहास.... संत गोरा कुंभारांचा जीवनपट.... या धार्मिक ऐतिहासिक विषयांबरोबर महाराष्ट्राची संस्कृती.... कोळीगीत... हिंदी... मराठी ..राजस्थानी नृत्य.... आणि सोबतीला चिमूरड्यांचा जल्लोष.... पालकांचा जोश आणि विद्यार्थी यांचे कष्ट..... शिक्षकांची मेहनत याच्या जोरावर उपस्थितांचा एकच जल्लोष... आणि कौतुकाची थाप यात.... आर एम डी धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
       आर.एम.धारीवाल इंग्लिश मेडीयम स्कूल, शिरूर इथे शैक्षणिक वर्ष २०२४-२५चा २७ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा दरवर्षीप्रमाणे दिमाखात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव  नंदकुमार निकम आवर्जून उपस्थित होते.
 इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना करत कार्यक्रमाची सुरुवात केली. पूर्व प्राथमिक विभागाचे कोळीगीत, प्राथमिक विभागाचे अनेकतेत एकता, गोरा कुंभार व सुभेदार तानाजी तर माध्यमिक विभागाने प्रशाला गीत, झाशीची राणी, राजस्थानी नृत्य अशा विविध विषयांना उजाळा देत प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी घारू यांनी शैक्षणिक वर्षात घेतलेले सर्व उपक्रम दृकश्राव्य माध्यमातून दाखवली.            कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  नंदकुमार निकम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नवीन शैक्षणिक धोरणाचे उद्दिष्टे व मुख्य बदल थोडक्यात सांगून आजची पिढी ही आपल्यापेक्षा स्मार्ट आहे त्यामुळे शिक्षक व पालक यांनीही आता काळाबरोबर बदलले पाहिजे असे प्रतिपादन केले.
     शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य  धरमचंद फुलफगर,  शिरीष बरमेचा,.राजेंद्र भटेवरा, चंदुलाल चोरडिया , शिरूर विकास आघाडीचे अध्यक्ष ॲड.सुभाष पवार,पत्रकार सतीश धुमाळ, शिरूर येथील विविध शाळांचे मुख्याध्यापक पोदार इंटरनॅशनल स्कूल नीरज रॉय,  डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे मुख्याध्यापक समीर ओंकार, साधना इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापक आशाकुमारी,ज्ञानगंगा विश्वविद्यालय सुनंदा लंघे, विद्यााधाम प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका ज्योती मुळे , पालक शिक्षक संघांचे पदाधिकारी असे सर्व मान्यवर हजर होते.
      कार्यक्रमासाठी घेतलेले कष्ट व कार्यक्रमाचा दर्जा पाहून सर्व मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी घारु  यांचे अभिनंदन तर शिक्षक वृंदांचे व सर्व कलाकारांचे विशेष कौतुक केले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!