(शिरूर प्रतिनिधी ) शिक्रापूर ता. शिरुर येथील मलठण फाटा येथील कानिफनाथ मंदिर शेजारी राहणाऱ्या आणि दहावीचे शिक्षण घेणाऱ्या प्रिया वाघ या युवतीला १० जानेवारी रोजी तिचे चुकते आण्णा वाघ यांनी काही कारणामुळे रागावत नीट शाळा शिक असे म्हटले होते, त्यांनतर ११ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास प्रियाचे वडील घरातील बेडरूम मध्ये गेले असता त्यांना प्रिया हिने गळफास घेतल्याचे दिसून आले, दरम्यान तिला उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी प्रिया दादाभाऊ वाघ वय १६ वर्षे रा. मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे हिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले, याबाबत दादाभाऊ हरिभाऊ वाघ वय ३८ वर्षे रा. मलठण फाटा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.
शिक्रापुरात पालक रागावल्याने शाळकरी युवतीची आत्महत्या
जानेवारी १२, २०२५
0
शिक्रापुरात पालक रागावल्याने शाळकरी युवतीची आत्महत्या
Tags