संतोष देशमुख खून प्रकरणात खून करणारे त्यात मध्ये असणारे या सर्वांचा बॉस धनंजय मुंडे... नैतिकदृष्ट्या देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढावे -अंबादास दानवे

9 Star News
0
संतोष देशमुख खून प्रकरणात खून करणारे त्यात मध्ये असणारे या सर्वांचा बॉस धनंजय मुंडे... नैतिकदृष्ट्या देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी त्यांना मंत्रिमंडळातून काढावे -अंबादास दानवे
शिरूर दिनांक प्रतिनिधी 
संतोष देशमुख खून प्रकरण करणारे आरोपी आणि जे मध्ये आहेत ते या सर्वांचे बॉस धनंजय मुंडे आहे त्यामुळे या खून प्रकरणाची संशयाची सुई धनंजय मुंडे यांच्याकडे जात आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी शिवसेना आंदोलन करणार का? याविषयी विचारले असता दानवे म्हणाले नैतिकदृष्ट्या मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढने हे त्यांचे कर्तव्य ठरते 
         स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा इंटरेस्ट असतो त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी इच्छा शिवसैनिकांची आहे म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून होकार येण्याची शक्यता आहे. तर विधानसभा लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीवर होऊ शकतात या निवडणुकीत चर्चा वाटाघाटी असते. असे सांगून स्थानिक स्वराज्य निवडणुका स्वबळावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी लढवल्यामुळे महाविकास आघाडीत कुठले मतभेद होणार नाही केवळ सर्वसामान्य शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना संधी मिळावी एवढाच यातून प्रयत्न असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सांगितले. 
      शिरूर येथे तालुकाप्रमुख पोपट शेलार यांच्या कार्यालयास आज विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भेट दिली त्यावेळेस ते बोलत होते. 
      यावेळी तालुकाप्रमुख पोपट शेलार, शहर प्रमुख संजय देशमुख, जिल्हा संघटक राजेंद्र शिंदे,नगरसेवक मंगेश खांडरे उपतालुकाप्रमुख राहुल शिंदे अमोल हरगुडे गणेश शिवले कुंडलिक पवार, शिवसैनिक खुशाल गाडे,पप्पू गव्हाणे, महादेव कडाळे, संतोष गव्हाणे आकाश खांडरे व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी शिरूर तालुका व शिरूर शहर शिवसेनेच्या वतीने अंबादास दानवे यांचा सत्कार करण्यात आला.
             सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा ही मागणी सगळ्यात पहिली शिवसेनेने केली आहे या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी सगळ्यात पहिला जाणारा मी असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगून तोपर्यंत याची दाहकता, तीव्रता महाराष्ट्राला माहिती नव्हती. याबाबतचा आवाज अधिवेशनामध्ये सर्वप्रथम उठवून संतोष देशमुख खून प्रकरणाची दाहक्ता तीव्रता व राजकारण , अर्थकारण याची माहिती महाराष्ट्राला, जनतेला दिली आहे. त्यानंतर तेथील आमदार राजकीय पक्ष यांनी आवाज उठवला या गंभीर गोष्टीला हात घातला आहे. 
         संतोष देशमुख खून प्रकरण करणारे आरोपी आणि जे मध्ये आहेत ते या सर्वांचे बॉस धनंजय मुंडे आहे त्यामुळे या खून प्रकरणाची संशयाची सुई धनंजय मुंडे यांच्याकडे जात आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी शिवसेना आंदोलन करणार का याविषयी विचारले असता दानवे म्हणाले नैतिकदृष्ट्या मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढने हे त्यांचे कर्तव्य ठरते असे सांगून हजारो कोटीची संपत्ती जमावणारा वाल्मीक कराड याची इडी ने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींवर मोका लागला आहे. या खून प्रकरणाची चौकशी सीआयडी मार्फत सुरू आहे लवकर तुम्हाला वाल्मीक कराडला मोक्का लागेल असेही दानवे यांनी सांगितले. 
         शिरूर विधानसभेमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख माऊली कटके हे दुसऱ्या पक्षात गेले आणि निवडून येऊन आमदार झाले असे अनेक माऊली कटके आहेत की त्यांची निवडून येण्याची क्षमता आहे. परंतु आघाडीमुळे त्यांना वेगळा विचार करावा लागत असल्याची सांगून, म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कार्यकर्त्यांना संधी मिळावी म्हणून स्वबळावर लढण्याची इच्छा शिवसेनेने घेतले असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार माऊली कटके आणि आमचे या अगोदर नाते होते आताही नाते आहे भविष्यात वेळ पडली तर परिवर्तन होऊ शकते असे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी सांगितले.
       शिरूर लोकसभा व शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे मोठी ताकद असून या पुढील काळामध्ये हे दोन्ही मतदार संघ शिवसेनेकडे घ्यावे अशी मागणी शिरूर तालुका पमुख पोपट शेलार व शहर प्रमुख संजय देशमुख यांनी केली आहे.
       

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!