पद्मश्री सिंधुताई सकपाळ माईंचे कार्य अविरत चालू राहणे म्हणजे माई आपल्यात असणे आहे, 'पाठी असावी माया आपुली अन् देवाचे छत्र...आम्ही फक्त निमित्तमात्र' हा माईंच्या कार्याचा गुरुमंत्र घेऊनच निःस्वार्थ सामजिक व राजकीय काम करण्यास मदत होते.माई आणि माझे भावनिक नाते होते,माझा अपघात झाला तेव्हा माई मला भेटायला आल्या होत्या.. माईंसारखी व्यक्ती आपल्या महाराष्ट्रात होऊन गेली ह्याचा अभिमान आहे माईंसोबतच्या गोड आठवणींना उजाळा देऊन माई परिवारातील सर्व मुलांच्या कल्याणासाठी सदैव मदत करेन असे आश्वासन नामदार महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी पद्मश्री डॉ.सिंधूताई सपकाळ (माई) यांच्या शिरूर येथील द मदर ग्लोबल फाऊंडेशन च्या 'माईनगरी' या अनाथ आश्रमाला भेट दिली यावेळी दौंड मतदार संघाचे आमदार राहुल कुल भाजपा शिरूर तालुका अध्यक्ष.आबासाहेब सोनवणे, शिरूर ग्रामपंचायत उपसरपंच.बाबाजी वर्पे, राहुल महाजन, बाळासाहेब पळसकर, संस्थेचे कार्याध्यक्ष यश सूर्यवंशी, अधिक्षिका मीनाक्षी लटांबळे व कर्मचारी वर्ग यावेळी उपस्थित होते .
.संस्थेचे अध्यक्ष विनय सपकाळ हे नेहमी माझ्या संपर्कात असतात आणि त्याच्याकडून मला माईंच्या कार्याची माहिती मिळत असते असे त्यांनी यावेळी नामदार गोरे सांगितले,
यावेळी आमदार राहुल कुल म्हणाले सिंधुताई सपकाळ माई म्हणजे अनाथ निराधार वंचितांचा आधार आहेत, त्यांचे हे काम कायमस्वरुपी चालू ठेवण्यात माझा नक्कीच खारीचा वाटा असेल, आम्ही ही माईंचे लेकरं च आहोत.
मंत्री महोदयांचे आभार मानत असताना ही भेट माई परिवारातील मुलांसाठी प्रेरणादायी ठरली असून, ह्यामुळे माईंचे कार्य अधिक बळकट होईल याची खात्री वाटते.. असे
द मदर ग्लोबल फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक सचिन ढोरमले म्हणाले.