घोडगंगा सहकारी साखर कारखाना चोरीच्या नावाखाली कोण ओरबडून खातंय... याबाबत संशय...

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी
      शिरूर तालुक्यातील कामधेनु घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची लसके आता भंगार चोर तोडू लागले आहे हे लचके भंगार चोर तोडतात की राजकारणातून कारखाना कायमस्वरूपी बंद पडावा यासाठी चोरीचा बनाव केला जातोय का? असा संशय आता येऊ लागला आहे. 
          गेल्या दोन हंगामापासून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा गळीत त बंद झाले आहे. कारखाना शेवटची घटका मोजत असून हा कारखाना सुरू करणार त्याच्या भीम गर्जना सुरू आहे. 
           नुकत्याच २ महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकी कारखाना बंद पडल्याचे खापर सर्व राजकीय नेत्यांनी तत्कालीन आमदारा अशोक पवार व संचालक यांच्यावर फोडून त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार कारखाना बंद पाडणे हा मुद्दा निवडणुकीत कळीचा करून ठेवला होता. 
           सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी नागरिक यांनाही हा मुद्दा पटला आणि आमदार अशोक पवार यांना संपूर्ण मतदारसंघातून विरोध झाला मोठ्या मताधिक्याने त्यांचा पराभव झाला. निवडणुकी प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची उमेदवार माऊली कटके यांना निवडून देण्याचे आव्हान व ते निवडून आल्यानंतर घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची आश्वासन दिले होते. 
          विधानसभा निवडणुकीला दोन महिने झाले आहे. घोडगंगांवर प्रशासन बसून घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याची अजित पवार यांनी सांगितले. ही चांगलीच गोष्ट आहे घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू व्हावा ही सर्वांची इच्छा आहे. 
तो कारखाना कसा सुरू करायचा ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठरवावे त्याला सर्व जनतेचा पाठिंबा आहे. 
            परंतु गेल्या दोन ते तीन महिन्यापासून घोडगंगा सहकारी साखर कारखान्यामध्ये भंगार चोरांचा सुळसुळाट झाला आहे या अगोदर ४ जानेवारी २५ रोजी येथील पावर हाउस मध्ये ठेवलेल्या ८ मोटार चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद शिरूर पोलीस स्टेशनला झाली. त्यानंतर आता २४ जानेवारीला पॉवर हाऊस मधूनच चोरीचा नवीन एक चोरीचा गुन्हा शिरूर पोलीस स्टेशनला दाखल झाला. 
          ही चोरी नक्की चोरट्यांनी केली की या चोरीच्या मागे कारखाना कायमस्वरूपी बंद पडावा म्हणून चोरीचा बनाव राजकारण्यांचा नाही ना असा संशय येऊ लागला आहे. 
           अगोदर दोन वर्षापासून घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे गळीत हंगाम बंद असून कारखाना पूर्णपणे बंद आहे या कारखान्याचे सर्व पार्ट लोखंडी आहे या यांच्यावर मोठ्या प्रमाणात गंज चढलेला आहे. काही दरवर्षी निकामी होतात. तर काही पार्ट दरवर्षी बदलले जातात. परंतु गेल्या दोन वर्षापासून कारखान्याची संपूर्ण पार्ट कारखाना बंद असल्यामुळे गंजून गंजून गेले आहे. या कारखान्याची खत होण्यास सुरुवात झाली आहे. त्यात कारखान्याला ओरबडून खाण्यासाठी भंगार चोर ही सोडत नाही अशी आजची परिस्थिती आहे. हे भंगार चोर असतील तर ते या कारखान्यातील वस्तू चोरण्या त तरबेज झाले असतील त्यांनी नक्की कोण कोणते व किती महत्त्वाचे पार्ट चोरले असतील हे आज तरी आपल्याला सांगता येणार नाही कारण कारखान्याची वर लक्ष देण्यासाठी आता कोणीच उरले नाही. 
        यामध्ये महत्वाचे पार्ट चोरट्यांनी चोरून नेले असतील तर कारखाना पूर्णपणे डब घ्याईला जाऊ शकतो. मग हे राजकारणी कारखाना पूर्णपणे संपलेला असल्याचे सांगून दिलेला निधी मध्ये कारखाना सुरू होऊ शकत नाही आणि त्यासाठी जास्तीचा निधी द्यायला बँक तयार नाही असे कारणही पुढे येऊ शकते त्यामुळे कारखाना कायमस्वरूपी बंद होऊ शकतो. 
          नक्की कारखान्यात होणाऱ्या चोऱ्या भंगार चोरच करतात का? त्या गरिबांच्या नावाखाली यावर ताव मारणारे राजकारणी तर नाही ना असा संशय ही आल्याशिवाय राहत नाही. 
          त्यामुळे राज्य सरकारने यामध्ये लक्ष घालून घोडगंगा सहकारी साखर कारखाना तुम्हाला जर खरे चालू करायचा असेल तर आजपासून त्याच्या कामाला लागणे गरजेचे आहे. तुमची मानसिकता घोडगंगा सहकारी साखर कारखाना चालू करायचे असेल तर तुमचे प्रयत्न यशस्वी होतील .परंतु अशा प्रकारे चोऱ्यामाऱ्या झाल्या तर कारखाना तुम्ही तरी कसा सुरू करू शकाल असेच म्हणावे लागेल....
        घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर सुरक्षारक्षकही तैनात आहे परंतु या चोऱ्या होताना ही सुरक्षारक्षक कुठे जातात. तुम्हाला कारखान्याची सुरक्षा पाहिजे आहे की तुमचा पगार केवळ पाट्या टाकण्याची काम सुरक्षा रक्षकांनी करू नये. याबाबत सखोल चौकशी होऊन कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.....
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!