26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शिरूर तहसील कार्यालय येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमासाठी शिरूर तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान आमदार (ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके) उपस्थित न राहिल्याने चर्चेचा विषय झाला.
शिरूर विधानसभा मतदारसंघ हा शिरूर शहरात व शिरूर तालुक्याच्या नावाने झाला आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असो किंवा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन असो विद्यमान आमदार हे शिरूर तहसील कार्यालय आवारात शासकीय ध्वजारोहणासाठी उपस्थित राहतात ही परंपरा असून प्रत्येक वेळेस आमदार या ठिकाणी उपस्थित राहतात.
परंतु शिरूर विधानसभा मतदारसंघाची नुकक्तीच निवडणूक झाली आणि ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके शिरूर विधानसभेचे आमदार झाले. ते जरी वाघोली हवेली तालुक्यातील असले तरी त्यांनी शिरूर तालुक्यात ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उशिरा का होईना येणे गरजेचे होते. परंतु शिरूर तालुक्याच्या इतिहासात आमदार फक्त वाघोली चा असो किंवा शिरूरचा असो येणे गरजेचे होते परंतु शिरूर चे आमदार ज्ञानेश्वर माऊली कटके या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आले नाही. त्यामुळे उपस्थितांमध्ये चर्चा सुरु होती.
त्यामुळे शिरूर तालुक्यातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत असताना आपल्या तालुक्यातील आमदार हवा होता असा सूरही आवळला.
जरी आमदार कटके यांना याबाबत काही वाटत नसले तरी नागरिकांना मात्र आमदारांनी यावे हीच अपेक्षा असती ती अपेक्षा आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी अपेक्षाभंग केली आहे.