मांडवगण फराटा येथे २२ म्हशीची वाहतूक करणारा टेंपो पकडला

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी
      मांडवगण फराटा(ता. शिरूर) येथे अवैधरित्या म्हशीची वाहतूक करणारा आयशर टेंपो पोलिस पथकाने पकडला असून, त्यात २१ म्हशीची पारडी, एक टोणगा व आयशर टेंपो असा एकूण ६ लाख ७२ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आहे.
        याप्रकरणी रविकांत पांडुरंग माने (वय ३५, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर) या टेंपो चालकाला अटक करण्यात आली आहे.
          भाऊसाहेब शहाजी टेगले पोलिस अंमलदार शिरूर पोलिस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे.
     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे दिनांक २४ जानेवारी रोजी दुपारी सव्वा दोन च्या दरम्यान पोलिसांना गोपानिय बातमीदारा कडून माहिती मिळाली की वडगाव रासाई येथून करमाळा येथे आयशर टेंपो क्रमांक एम.एच.१४ ई.एम.१०५०
मधून अवैधरित्या म्हशीची वाहतूक करून ते कतली साठी घेऊन जात आहे. ही माहिती मिळतात पोलीस पथकाने प्राणी मित्रांसह मांडवगण फाटा येथे सापळा रचून मिळालेल्या माहितीप्रमाणे टेम्पो येताच पोलिस पथकाचे तो थांबवला त्याची पाहणी केली असता टेंपो मध्ये दाटी वाटीने म्हशीची पारडी (पिल्ले) व एक रेडकू कुठलेही चारा पाणी नदेता कोंबून बसवलेली होती. त्यातील एक पारडीचा कोंबून बसल्याने तिचा मृत्यु झाला. यावेळी चालकाला ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्याने रविकांत माने असे सांगून ही पारडी वडगांव रासाई ता. शिरूर येथून खरेदी करुन कोर्टी,करमाळा येथे बबन गिरमे यांचे कडे घेऊन जात असल्याचे सांगितले.
पोलीसांनी एकवीस म्हशीची पारडी, एक रेडकू असा एकूण १ लाख ६८ हजार व आयशर टेंपो असा ६ लाख ७२ हजाराचा ऐवज जप्त केला आहे.
      ही कार्यवाही पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार भाऊसाहेब टेंगले, पोलिस हवालदार शिंदे,प्राणी मित्र मिनीनाथ विलास गव्हाणे, योगेश केशव मचाले, सागर रमेश गव्हाणे, संजय पोपट गव्हाणे, अमोल आनंदा चौघुले (सर्व रा. मांडवगण फराटा) यांनी केली आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून
       पुढील तपास सहाय्यक फौजदार कदम करीत आहे.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!