शिक्रापूर पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेने टळला अनर्थ

9 Star News
0
शिक्रापूर पोलीस व नागरिकांच्या सतर्कतेने टळला अनर्थ
शिरूर 
( प्रतिनिधी ) शिक्रापूर चाकण रस्त्यावरील कंटेनरच्या अपघाताचा पंचवीस किलोमीटर चा थरार नुकताच नागरिकांनी अनुभवला सदर अपघातात मद्यधुंद कंटेनर चालकाने तब्बल वीस ते पंचवीस किलोमीटर ट्रक भरधाव वेगाने नेत अनेक वाहनांसह नागरिकांना चिरडले मात्र शिक्रापूर पोलिस व पोलिस मित्रांच्या तत्परतेने संतप्त जमावाच्या गराड्यातून चालक बचावत पुढील अपघात आणि अनर्थ टळले गेले आहे.
                       चाकण शिक्रापूर रस्त्यावर १६ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास चाकण बाजूकडून मद्यधुंद अवस्थेत आलेल्या एच आर ५५ ए व्हि २२८३ या कंटेनर चालकाने दोन महिलांना ठोकर देत शिक्रापूर चा रस्ता धरला यावेळी समोर येईल त्या वाहनांना धडक देत कंटेनर चालकाने त्याचा प्रवास सुरुच ठेवला बहूळ गावामध्ये पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील पोलिसांनी पोलीस वाहन रस्त्यावर लावून कंटेनर चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र कंटेनर चालक पोलिसांच्या वाहनाला धडक देत तसाच पुढे गेला. काही वेळा त्याने पुणे ग्रामीण पोलिसांची हद्द कंटेनर चालकाने गाठत समोर येईन त्या वाहन व नागरिकांना धडक देत राहिला यावेळी अनेक दुचाकी चालक कंटेनरचा पाठलाग करत होते परंतु मध्य धुंद कंटेनर चालकाला काहीच समजत नव्हते, जातेगाव खुर्द येथे संदीप उर्फ दत्ता खलाटे या युवकाने खडीने भरलेले दोन अवजड मोठे हायवा डंपर रस्त्यावर उभे केले, काही क्षणात भरधाव वेगाने आलेला कंटेनर डंपरला धडकून रस्त्यावर थांबला दरम्यान कंटेनरचा पाठलाग करणाऱ्या आणि तेथे जमलेल्या संतप्त जमावाने कंटेनर वर जोरदार दगडफेक करत काठ्यांचा मारा सुरू केला यावेळी तेथे असलेले पोलीस हवालदार आत्माराम तळोले, अमोल दांडगे, शिपाई लखन शिरसकर व पोलीस मित्र शेरखान शेख यांनी भर दगडफेकीतून कंटेनर चालकाला बाहेर घेतले मात्र संतप्त जमावाने काठी दगड लाथा बुक्क्यांनी कंटेनर चालकाला मारहाण सुरू केली यावेळी पोलीस व पोलीस मित्रांनी यांनी तत्परतेने जखमी कंटेनर चालकाला पोलीस वाहनात टाकून रुग्णालयात हलवले त्यामुळे कंटेनर चालक नागरिकांच्या तावडीतून बचावला दरम्यान जमलेला संतप्त जमाव हा अपघात ग्रस्त कंटेनर पेटवून देण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना समजताच त्यांनी थेट दुचाकी होऊन घटनास्थळी धाव घेत तेथे जमलेल्या जमावाला बाजूला केले यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने मोठी वाहतूक कोंडी झालेली असताना पोलीस पाटील कृष्णा गजरे, सामाजिक कार्यकर्ते धर्मराज बोत्रे, गुरुदास चंद्रावळे, कचरू वाजे, योगेश थिटे, नितीन सय्यद, प्रदीप बेंडभर, इंन्नूस मुलाणी, अविनाश तांबे यांसह आदींनी वाहतूक कोंडी दूर करत रस्ता मोकळा केला काही वेळात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व चाकण पोलीस स्टेशनच्या अनेक अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली नंतर क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला करण्यात आला परंतु सदर थरारमध्ये संदीप उर्फ दत्ता खलाटे यांनी त्यावर उभ्या केलेल्या डंपरमुळे कंटेनर तेथे थांबला चार ते पाच मिनिटात कंटेनर शिक्रापूर चौकात पोहोचून मोठी दुर्घटना झाली असती मात्र पोलीस हवालदार आत्माराम तळोले, अमोल दांडगे, शिपाई लखन शिरसकर व पोलीस मित्र शेरखान शेख यांनी तत्परता दाखवत कंटेनर चालकाला संतप्त जमावाच्या गरड्यातून बाजूला केले नसते तर त्या कंटेनर चालकाचा देखील जीव गेला असता अशा दोन घटना या पोलीस व पोलीस मित्रांच्या तत्परतेने टळल्या गेल्या आणि मोठा अनर्थ टळला आहे.
स्वतंत्र चौकट १ –
पोलीस निरीक्षकांचा दुचाकी प्रवास . . . . .
शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चाकणहून आलेला कंटेनर धडकून थांबल्यानंतर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आणि घटनास्थळाची परिस्थिती आटोक्याच्या बाहेर जाणार असल्याचे लक्षात आल्याने शिक्रापूरचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी थेट दुचाकीहुन रस्ता काढत घटनास्थळ गाठत परिस्थिती नियंत्रणात आणली.
स्वतंत्र चौकट २ - 
चाकण शिक्रापूर रस्त्यावरील अपघात पोलीस कर्मचारी व काही पोलीस मित्रांनी दाखवलेली तत्परता नक्कीच कौतुकास्पद असून त्यांच्यामुळेच नंतर पुढे घडणाऱ्या दोन दुर्दैवी घटना टळल्या असल्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले.
सोबत – तत्परता दाखवणारे धाडसी पोलीस व पोलीस मित्र फोटो.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!