शिरूर तालुक्यातील शेतक-याची उसतोडीसाठी मजुरांचे टोळी नावाखाली १० लाख ९५ हजार रूपयेची अर्थिक फसवणुक करणा-या मुकादमास शिरूर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे.
अनिल ताराचंद राठोड (रा पिंपरखेड, गोरखपुर तांडा, ता चाळीसगाव जि जळगाव ) याला पोलिसांनी अटक केली आहे.
बबन बाळासाहेब कोळपे,( वय ३८ वर्ष, व्यवसाय शेती, रा मांडवगण फराटा ता. शिरूर जि पुणे) यांनी फिर्याद दिली होती.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक 4 जून 2023 ते 1 ऑक्टोबर 2024 दरम्यान फिर्यादी बबन कोळपे यांना ऊसतोड करण्यासाठी मजुराची टोळी देतो असे सांगून अटक अनिल राठोड व त्याचे दोन साथीदार चंदर राठोड, ताराचंद राठोड यांनी दहा लाख 95 हजार रुपये घेऊन मजूर न देता कोळपे यांची फसवणूक केली होती याबाबत शिरूर पोलीस स्टेशन नेते गुन्हा दाखल झाला होता.
शेतकऱ्यांची अशाप्रकारे फसवणूक झाल्याची गंभीर दखल शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी घेऊन याबाबत शिरूर पोलीस स्टेशनचे स्थानिक तपास पथक यांना या गुन्ह्याचा तपास करण्याच्या आदेश दिले त्याप्रमाणे स्थानिक तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अंमलदार विनोद काळे, नितेश थोरात, सचीन भोई, विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, अजय पाटील हे या आरोपींचा शोध घेत असता पोलीस अंमलदार नितेश थोरात या गुन्ह्यातील आरोपी मुकादम अनिल ताराचंद राठोड हा शिरूर येथील कुकडी कॉलनी येथे येणार असल्याची माहीती गोपनीय बातमीदाराकडून मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथकाचे सापळा लावुन शिताफिने मुकादम अनिल ताराचंद राठोड यास अटक केली.
ही कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख , पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरूर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप पोलिस अंमलदार विनोद काळे, नितीन थोरात, सचिन भोई, विजय शिंदे, नीरज पिसाळ, निखिल रावडे, अजय पाटील या पोलीस पथकने केली आहे