दसगुडे मळा, रामलिंग ता.शिरूर येथे शेतकरी व त्याची पत्नी शेतात व बाहेर गेल्याचा फायदा घेत बंद घराचा दरवाजा उघडून घरातील कपाटामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने व रोख पन्नास हजार रुपये असा एकूण ६ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरी करून नेला आहे.
कांचन सोमनाथ दसगुडे ( रा . राहणार दसगुडे मळा रामलिंग शिरूर तालुका शिरूर ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादनुसार दसगुडे मळा, रामलिंग ता.शिरूर दिनांक १६ जानेवारी २५ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी घरापासून जवळच असलेल्या शेतातील कामे करण्यासाठी गेल्या होत्या, तर त्यांचे पती सोमनाथ दसगुडे हे भेंडी विक्रीसाठी शिरूरच्या बाजारात गेले होते. दुपारी तीन ते साडेतीनच्या सुमारास कांचन यांना घरासमोर एक दुचाकी उभी असल्याचे दिसल्याने त्या घराकडे आल्या, तेव्हा घराचा दरवाजा उघडा दिसला म्हणून त्यांनी आत जावून पाहिले असता घराच्या कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. त्यामुळे त्यांना संशय आला तेव्हा त्यांनी कपाटातील दागिने, पैशांची पाहणी केली असता कानातील साखळी सह बारा ग्रॅम सोन्याचे झुंबर, दोन तोळे वजनाचे सोन्याचे नेकलेस, तीन तोळे वजनाचा सोन्याचा गंठण,७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे (आक्काबाई) मणी मंगळसूत्र, दोन पाच-पाच ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठी, नाकातील २ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ, १ग्रॅमचे मणी मंगळसूत्र, चांदीचे जोडवे व बिचवे, १० ग्रॅम सोन्याचे मणी, लॉकर मधील रोख ५० हजार रुपये असा एकूण ६ लाख ३६ हजार रुपये ऐवज चोरटयांनी चोरुन नेला आल्याचे लक्षात येताच घरा बाहेरील दूचाकीचा संशय आल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता दूचाकीही दिसली नाही. त्यामुळे घरात चोरी झाल्याने शिरूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली असून, पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल चव्हाण करीत आहे.