कारेगावात कोयत्याने दहशत माजवत रक्कम चोरीकरणाऱ्यांच्या मुसक्या रांजणगाव पोलिसांनी आवळल्या

9 Star News
0
कारेगावात कोयत्याने दहशत माजवत रक्कम चोरी
करणाऱ्यांच्या मुसक्या रांजणगाव पोलिसांनी आवळल्या 
शिरूर 
( प्रतिनिधी ) कारेगाव ता. शिरुर येथील चिंतामणी हॉस्पिटल जवळ एका मनी ट्रान्सफरच्या दुकानात चौघांनी कोयत्याने दहशत माजवत दुकानात तोडफोड करत पस्तीस हजार रुपये चोरुन नेल्याची घटना घडल्याने रांजणगाव एमआयडीसि पोलिस स्टेशन येथे
चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चारही जणांच्या मुस्क्या 24 तासाच्या रांजणगाव पोलिसांनी आवळल्या आहे. 

      प्रथमेश उर्फ बच्चा नवले, आयर्न नवले, ओम पवार व वैभव गाडे (सर्व रा. कारेगाव ता. शिरुर जि. पुणे) या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

          याबाबत ज्ञानेश्वर कान्हू डांगे ‌(वय २१ वर्षे रा. सोने सांगवी ता. शिरूर जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलिस स्टेशन येथे फिर्याद      
         कारेगाव ता. शिरुर येथील ज्ञानेश्वर डांगे व ऋषिकेश डांगे हे त्यांच्या मनी ट्रान्सफरच्या दुकानात असताना प्रथमेश नवले सह तिघेजण दुकानात आले त्यांनी ज्ञानेश्वर व ऋषिकेश यांना शिवीगाळ दमदाटी करत दुकानाचे शटर खाली घेऊन दोघांना कोयत्याचा धाक दाखवत दुकानातील दरवाज्याची काच व फिंगर प्रिंट घेण्याचे डिवाइस मशीन फोडून नुकसान करत पुन्हा कोयता दाखवत दुकानातील ड्रावर मध्ये असलेले पस्तीस हजार रुपये काढून घेत हातातील कोयता फिरवत दहशत माजवत चौघेजण पैसे घेऊन गेले, याबाबत ज्ञानेश्वर डांगे यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने चौघांवर गुन्हा दाखल केला फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा घडल्याबाबत माहिती प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलिस हवालदार माऊली शिंदे यांना तात्काळ आरोपीचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घटनास्थळावरील सिसीटिव्ही (CCTV) फुटेजची पहाणी केली असता त्यामध्ये एकुण पाच आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर गुन्ह्यास दरोड्याचे वाढीव कलम लावण्यात आले.
सदरचा गुन्हा घडल्यानंतर पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन वेगवेगळी तपास पथके तयार करुन रवाना केली होती. या तपास पथकाच्या मदतीने रात्री व दिवसभर शोध घेवुन सदर गुन्हयातील आरोपी १) ओम दिलीप पवार (सध्या रा. कारेगाव, ता.शिरुर, जि. पुणे) मुळ रा. नाथनगर, पाथर्डी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर २) वैभव धोंडीभाऊ गाडे मुळ (रा. चांडवली, ता.खेड.जि.पुणे) यांना २४ तासांच्या आत अटक करण्यात आलेली असुन त्याच्या सोबतचे इतर दोन अल्पवयीन आरोपीना सुद्धा गुन्हयाच्या तपास कामी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच सदर गुन्हयातील मुख्य आरोपी प्रथमेश उर्फ बच्चा नवले याचा तपास पथकाच्या मदतीने शोध सुरु आहे.

      सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंढे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, पोलिस हवालदार विलास आंबेकर, संतोष औटी, माऊली शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल आकाश सवाणे, किरण आव्हाड यांनी केली आहे. 
पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निळकंठ तिडखे हे करत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!