ज्ञानगंगा शाळा व शिरूर पोलीस स्टेशन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

9 Star News
0
ज्ञानगंगा शाळा व शिरूर पोलीस स्टेशन येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
शिरूर प्रतिनिधी 
      शिरूर पोलीस स्टेशन व ज्ञानगंगा शाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमीत्त अभिवादन करुन जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तर यावेळी रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पुरस्काराचे वाटपही करण्यात आले.
तर शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले.
   3 जानेवारी 2025 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती ज्ञानगंगा शाळा बापूराव नगर येथे रामलिंग महिला उन्नती व बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राणीताई कर्डिले व मुख्याध्यापिका सुनंदा लंघे यांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला.
             सावित्रीबाईंनी केलेले कार्य महान होते ,आज सावित्रीच्या लेकी सर्व क्षेत्रात पुढे आहेत.त्यांचे हे कार्य अविरत समाजात चालू रहावे,त्यांची प्रेरणा इतर महिला शिक्षकांना मिळावी म्हणून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या,सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या एका महिला शिक्षकांचा सन्मान या दिवशी करण्यात येतो.हे करत असलेले कार्य,कौतुकाची थाप म्हणून,त्यांना करत असलेल्या चांगल्या कार्याची अजून कार्य करण्यास प्रेरणा मिळावी म्हणून हा पुरस्कार देण्यात येतो.
आजचा हा पुरस्कार ज्ञानगंगा शाळेतील मुख्याध्यापिका सुनंदा लंघे यांना २०२५ क्रांतीज्ती सावित्रीबाई फुले पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, शाल देऊन देण्यात आला.
      यावेळी रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले ,ज्ञानगंगा शाळेच्या सर्वेसर्वा अमृता घावटे,घावटे सर,वैशाली साखरे, डॉ स्मिता कवाद,गीता आढाव ,इतर सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
सर्वांचे आभार संस्थेच्या वतीने राणी कर्डिले यांनी मानले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!