शिरूर तालुका नवीन बारामती जिल्ह्यात जाऊ शकतो ... सावधान शिरूरकरांनो....

9 Star News
0
शिरूर,(प्रतिनीधी)
      सध्या राज्यात नवीन जिल्हे वाढवण्याचे काम सुरू असून पुणे जिल्ह्याचे विभाजन करुण नविन बारामती जिल्हा निर्मिति करण्याचे काम गोपनीय पद्धतीने सुरु असून या जिल्ह्यात शिरूर तालुक्याला घेण्याचा अट्टहास राजकीय लोकांचा असला तरि शिरूर तालुक्यातील जनतेला बारामती जिल्ह्यात जाण्यास विरोध आहे. 
      आता शिरूर तालुक्यातील नागरिकांनी उठा जागे व्हा... उठा जागे व्हा अशी म्हणण्याची वेळ आली आहे व मोठ्या आंदोलन करण्यासाठी तयारीही करावी लागणार आहे.
       
        बारामती हे गाव शिरूर तालुक्यासाठी अडचणीत असणारे असून या मागे मोठे राजकारण असल्याचे दिसून येते आहे.शिरूर तालुका सध्या पुणे जिल्ह्यातील सर्वात सक्षम आणि सर्व गोष्टी संपन्न तालुका आहे. राज्यात व पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त सिंचन असणारा तालुका त्याचप्रमाणे आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित ओद्योगिक वसाहत, संपूर्ण पुणे नगर रस्ता इंडस्ट्रिने घेरला आहे.यामुळे या तालुक्याला वेगळेच महत्व आहे. तर ऐतिहासिक दृष्टया छत्रपति संभाजी महाराज यांची समाधि वढु बुद्रुक तर मस्तानी समाधी पाबळ ऐतिहासिक विजय स्तंभ,रांजागाव गणपति क्षेत्र, पाबळचे जैन स्थानक अशा अनेक गोष्टींनी शिरूर तालुक्यांची ओळख आज देशाच्या नकशावर आली आहे,
       शिरूर तालुक्यांचे आधीच निवडणुकी करीता विभाजन केले गेले आहे या तालुक्यांची ३९ गा.वे आंबेगाव विधानसभा ला जोडली गेली आहेत .यामुळे या तालुक्याला दोन आमदार जरी मिळाले असले तरी नागरिक व् सर्वसामान्य नागरिकांचे जे हाल होतात ते राजकीय पुढाऱ्याना दिसत नाही कारण त्याना त्यांची पोळी भाजायची एवढेच माहिती आहे.
       येथील अधिकारी वर्गाची गत इकडे आड़ इकडे विहीर अशी होत आहे,या आमदाराने बैठक लावली की लगेच त्या आमदाराची बैठक सुरु होते.सगळ्याच बाबतीत घोळच घोळ. 
 पोलिस स्टेशन म्हणू नका ,महसुल विभाग म्हणू नका ,पंचायत समिति सगळीकडे नुसती ओढ़ा ओढ़ी सुरू आहे ,पूर्व भागाला मिळाले तर बेट भागाला का नाही यामुळे नुसते राजकारण त्या नंतर सुरु होते आमदारांची फोना-फोनि यामुळे सर्व अधिकारी वैतागुण गेले आहेत.
        शिरूर तालुक्याला पुणे हेच सोपे-शिरूर तालुक्याला पुणे हे जवळचे गाव जिल्ह्य
 करिता सोपे आहे . कुठूनही घेतले तरी 65 ते 70 किलो मीटर अंतर शिरुर तालुक्यांची सर्वात मोठी बाजार पेठ पुणे आहे.दळणवळण साठी सर्वात सोईस्कर कुठले काम जिल्हाधिकारी कार्यालयात असेल तर नागरिक सकाळी जाऊं दुपार पर्यन्त पुन्हा घरी येऊ शकतो शिरूर तालुक्यातील हजारो नागरिक कामा-व्यवसाया निमित्त पुणे येथे रोज येतात शिरूर तालुक्याचा अनेक गावातून थेट पुण्याकरिता बसेस उपलब्ध आहेत.अनेकांचे नातेवाईक मोठ्या प्रमान्त असल्याने कामा निमित्त गेल्यास उशीर जहाला तर रहान्याची अड़चन येत नाही.
     
शिरूर तालुक्यातून शंभर किलोमीटर अंतर असणारे बारामती हे शहर असून या शहराकडे जाण्यास वहातुक व्यवस्था अल्प प्रमाणात आहे.जाण्यासाठी रस्ते गेली अनेक वर्षा पासून खराब आहेत .तेथे केवळ शासकीय कामासाठी जाने नागरिकांना नपरवडणारे आहे.कुठली उत्तम सुविधा पुण्याप्रमाणे मिळणार नाही.व्यापारी दृष्टया याचा शिरूर तालुक्याला कुठलाच फायदा होणार नाही. सर्व गोष्टीनी सोईस्कर नसलेले बारामती जिल्हा खुशाल करावा परंतु शिरूर तालुक्याला त्यामधे घेऊ नये कारण शिरूर तालुका सर्व दृष्टया सक्षम आहे.त्याचा फायदा व्हावा व् त्या तालुक्यावर आपले वर्चस्व राहावे म्हणून हा खटाटोप् चालला असल्याचा संशय येत असून, त्यासाठी जिल्ह्याचे मोठे नेते यांचे लक्ष्य तर देशाचा नेत्याची नजर असल्यानेच गेल्या अनेक वर्षा पासून बारामती जिल्हा करण्यासाठी गोपनीय पद्धतीने काम सुरू आहे.
      मधे ही चर्चा बंद झाली होती.परंतु ती पुन्हा सुरू झाली असून शिरूर तालुक्याकडे या जिल्ह्यात समावेश करण्यासाठी अनेक राजकीय पक्षाची तैयारी सुरू असल्याचे यावरून दिसून येत आहे. शिरूर तालुक्यांचे पुणे जिल्ह्यातुं काढून नविन बारामती जिल्ह्यात समाविष्ट करण्याचे कारणस्थान सुरु असून, या विषयी शिरूर तालुक्यात नाराजी आणि संताप सुरु झाला असून,असे ज़हाले तर शिरूर तालुक्यातील नागरिक सर्वसामान्य जनता ,शेतकरी,व्यापारी मोठे आंदोलन करण्याचा तयारीत आहे.
      जर शिरूर तालुक्याचा बारामती जिल्ह्यात समावेश करायचा असेल तर याबाबत नागरिकांचया हारकति ,सूचना मागावने क्रम प्राप्त आहे.असे जर नकेल्यास प्रशासन व् राजकीय नेत्यांना मोठी किंमत मोजावी लागणार 
      आहे.शिरूर तालुका हा पुणे शहरापासून सर्वात जवळचा तालुका असून पुणे शहराचे जवळचे मोठे उपनगर म्हणून त्याकडे पाहिले जात आहे या तालुक्याला भविष्यकाळ चांगला असून त्याचा फायदा काही राजकीय नेत्यांना घ्यायचा असल्यानेच शिरूर तालुक्याचा बारामती या होणाऱ्या जिल्ह्यात समावेश करण्याचे मोठे षडयंत्र सुरू असून आधीच विधानसभा करिता ज़हालेले दोन भागात विभाजन त्यामुळे मोठी डोकेदुखी झाली असून, शिरूर तालुका बारामती जिल्ह्यात घ्यायचे राजकारण सुरु आहे.त्याला शिरूर तालुक्यांचे नागरिक विरोध् करणारच .........
       आज जरी शिरूर तालुक्यातील नागरीक शांत असला तरीही उद्या आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!