चाकण-शिक्रापूर रोडवर कंटेनर चालकाने हैदोस घातला आहे तब्बल वीस किलोमीटर दरम्यान अनेक वाहनाला कंटेनर चालकाने धडक दिल्याने यात अनेकजण जखमी झाले आहेत या थरारक घटनेचे व्हिडीओ देखील समोर आला आहे, संतापलेल्या नागरिकांनी चालकाला पकडून बेदम चोप दिला असून चालक जखमी झाला आहे, शिक्रापूर पोलीसांनी चालकाला ताब्यात घेऊन पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे
कंटेनर क्रमांक HR 55 AV 2283 चालक अकिब खान (वय 25) हा चाकणच्या माणिक चौकात दोन महिलांना उडवले. त्या भीतीपोटी तो सुसाट वेगाने शिक्रापूरच्या दिशेने पळ काढू लागला.
काही अंतरावर त्याने एका मुलीच्या पायावरून गाडी घातली. त्यानंतर चाकण पोलिसांनी पाठलाग सुरु केला, हे पाहून चालकाने कंटेनरचा वेग वाढवला ,वाटेत येणाऱ्या वाहनांना उडवत तो बेफाम निघाला होता. पुढं पोलिसांची गाडी त्याला रोखण्यासाठी थांबली होती. मात्र, चालकाने पोलिसांच्या वाहनाला ही धडक दिली. यात ट्रॅफिक वॉर्डन किरकोळ जखमी झाले आहेत.
चाकण ते जातेगाव या वीस किलोमीटर अंतरापर्यंत ही थरारक घटना घडली या झालेल्या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
चालकाला जातेगाव हद्दीत नागरिकांनी अडवून चांगलाच चोप दिला आहे. त्यात चालक जखमी असून शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे पुढील अधिकचा तपास चाकण व शिक्रापूर पोलीस करत आहेत.