शिरूर शहरात अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणा त शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकानेअटक केली असून, त्याच्याकडील एक पिस्तूल जप्त करण्यात आले असल्याची माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली आहे.
किरण सुनील पवार वय (23 वर्ष राहणार साईनगर शिरूर) या तरुणाला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी निखिल भिमाजी रावडे (पोलीस अंमलदार शिरूर पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत शिरोळ पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंदळे यांनी शिरूर शहरात अवैध पिस्तूल प्रकरणी तपास करून ती बाळगणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या दरम्यान शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाचे पोलीस उपनिरक्षक शुभम चव्हाण
यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की शिरूर शहरात एक तरुण साईनगर परिसरात अवैध पिस्तूल बाळगून फिरत आहे. ही माहिती मिळतात पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार सचिन भोई, नितेश थोरात, निरज पिसाळ, विजय शिंदे, निखील रावडे या पोलीस पथकाने साईनगर शिरूर या ठिकाणी सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली. त्याची अंग झडत घेतली असता त्याच्याकडे एक पिस्तूल सापडले याबाबतचे कुठलेही परवाना त्याच्याकडे नव्हत्या. त्याला त्याची नाव विचारले असता त्याने किरण सुनील पवार राहणार साईनगर तालुका शिरूर जिल्हा पुणे असे सांगितले.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे पोलिस अंमलदार निखिल रावडे यांनी फिर्याद दिली असून, त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करीत आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक पंकज देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांचे मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप, पोलीस अमंलदार नितेश थोरात, निरज पिसाळ, विजय शिंदे,, विनोद काळे, सचिन भोई, निखील रावडे, अजय पाटील यांचे पोलीस पथकाने केली आहे