शिक्रापूर ता. शिरूर पुणे नगर महामार्ग वर लक्झरी बसने प्रवास करणाऱ्या महिलेचा शेजारी बसणाऱ्या पुरुषाने विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथील पुणे नगर महामार्गावरून लक्झरी बसने प्रवास करणारी प्रवाशी महिला लक्झरी बसमध्ये असताना महिलेच्या शेजारी असलेल्या सीटवर सुनील इंगोले या इसमाने झोपेमध्ये असल्याचे नाटक करत महिलेच्या मानस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, यावेळी महिलेने आरडाओरडा करत थेट पोलीस स्टेशन गाठले, याबाबत पिडीत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने पोलिसांनी सुनील धोंडिबा इंगोले वय ४० वर्षे रा. मोखाड ता. पुसद जि. यवतमाळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.