जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शिरूर नगरपरिषदेला १२ पदके मिळून जिल्ह्यात अव्वल

9 Star News
0
जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शिरूर नगरपरिषदेला १२ पदके
शिरूर ,प्रतिनीधी
नगरविकास विभाग, नगरपरिषद प्रशासन संचालनालय पुणे जिल्हास्तरीय सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा सन २०२४- २५ मध्ये शिरूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेने १२ पदके मिळवली. वैयक्तिक स्पर्धेत एकूण १० पदके, या पैकी ५ प्रथम विजेते, तर सांघिक स्पर्धेत २ पदके मिळाली. व्हॉलीबॉल स्पर्धेत शिरूर संघाने प्रथम विजेता होण्याचा बहुमान मिळवला.

बारामती येथे दि. ९, १० आणि ११ जानेवारी रोजी स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये शिरूर नगरपरिषदेच्या प्रदीप साळवे यांना गोळा फेक (प्रथम), लांब
उडी (प्रथम), उंच उडी (प्रथम), १०० मीटर (प्रथम) अशी ४ पदके मिळाली. अधिकारी रामचंद्र नरवडे प्रहसन (स्किट) मध्ये प्रथम परितोषिक मिळाले. लेखाधिकारी पंकज माने यांना थाळी फेकमध्ये प्रथम परितोषक मिळाले. कार्यालयीन सहायक अधिक्षक शीतल काळे यांना २०० मीटर धावणेमध्ये द्वितीय, ४०० मीटर धावणे यामध्ये तृतीय, ३ किलोमीटर चालणे द्वितीय परितोषक अशी एकूण ३ पदके मिळाली. कर्मचारी संदीप चव्हाण यांनी लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक मिळाला.
      तर प्रदीप साळवे, नवनाथ मते, संदीप चव्हाण, पंकज माने यांना सांघिक १०० मीटर आय ४ या रिले प्रकारात प्रथम पारितोषिक मिळाले. व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये विद्युत अभियंता तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघाने प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेसाठी स्वच्छता निरिक्षक दत्तात्रय बर्गे यांनी सहकार्य केले.

नगररचना सहायक पंकज काकड, प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ, नगर अभियंता समाधान मुंगसे, पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, लेखा परीक्षक मोहन गुरव, कर निरीक्षक अक्षय बंगीनवार, कर निरीक्षक दीपक कोल्हे, स्थापत्य अभियंता शामली लाड, संगणक अभियंता रत्नदीप पालके व इतर कर्मचारी यांचे योगदान मिळाले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!