शिरूर,प्रतिनीधी
पारोडी ता. शिरुर येथील गगनगिरी मिल्क प्रोडक्ट डेअरीच्या ऑफिसची कडी वाजवली. दरवाजा उघडल्यानंतर चोरट्यांनी एकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून डेअरीच्या ऑफिस मधील साहित्यांचे नुकसान करत चार लाख एकोणीस हजार रुपयांची रोकड लांबवल्याची घटना घडली आहे.
राहुल माणिकराव ढमढेरे (वय ४२ वर्षे रा. पारोडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तीन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
पारोडी (ता. शिरुर) येथे राहुल ढमढेरे यांची गगनगिरी मिल्क प्रोडक्ट नावाने डेअरी असून, सदर ऑफिसमध्ये राहुल यांचे वडील माणिकराव झोपलेले असताना रात्रीच्या सुमारास कोणीतरी कडी वाजवल्याने माणिकराव यांनी कडी उघडली असता तिघा अज्ञात चोरट्यांनी आतमध्ये येत माणिकराव यांना ढकलून देऊन त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून धक्काबुक्की केली, दरम्यान तिघांनी ऑफिस मधील साहित्यांची तोडफोड करत ऑफिस मध्ये ठेवलेली चार लाख एकोणीस हजार रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला,
घडलेल्या घटनेबाबत राहुल माणिकराव ढमढेरे (वय ४२ वर्षे रा. पारोडी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे हे करत आहेत.