शिरूर प्रतिनिधी
शिरुर शहरातील बाबुरावनगर मध्ये राहणाऱ्या इसमाला पत्नीने दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने चक्क स्वयंपाक घरातील चाकू घेऊन पत्नीच्या गळ्यावर मारत पत्नीच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे स्वप्नील शंकर कुरंदळे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राणी स्वप्नील कुरंदळे ( वय ३४ वर्षे रा. विश्व विजय हाईटस बाबुरावनगर शिरुर ता. शिरुर जि. पुणे )यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी स्वप्नील शंकर कुरंदळे (वय ३४ वर्षे रा. विश्व विजय हाईटस बाबुरावनगर शिरुर ता. शिरुर जि. पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे शिरुर शहरातील बाबुरावनगर मध्ये राहणारे स्वप्नील कुरंदळे हे सायंकाळच्या सुमारास दारू पिऊन घरी आले आणि पत्नी राणी हिच्याकडे अजून दारु पिण्यासाठी पैसे मागू लागले, दरम्यान पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने रागामध्ये स्वयंपाकघरात जाऊन चाकू घेऊन येत थांब तुला मारूनच टाकतो असे म्हणत चाकू पत्नीच्या गळ्यावर मारला मात्र पत्नीने हात मध्ये घातल्याने चाकू गळ्याला घासून जात राणी हिच्या डोक्यावर व हातावर वार करून राणी कुरंदळे हिस गंभीर जखमी केले, पतीच्या स्वप्नील विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहे.