मुलीशी मैत्री,बाप व दोन मुलांकडून अल्पवयीन मुलाचा डोक्यात दगड घालून खून.

9 Star News
0

मुकूंद ढोबळे प्रतिनिधी
 मुलीशी मैत्रीचे संबंध.या कारणावरून बापाने दोन मुलांच्या मदतीने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा मारहाण करत मोठा दगड डोक्यात घालून खून केल्याची घटना बुधवारी रात्री १२ ते एक वाजण्याच्या सुमारास वाघोलीतील वाघेश्वर नगर गोरे वस्ती परिसरात घडली. याप्रकरणी तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
      सकाळी संतप्त नातेवाईकांनी आरोपीच्या घराची दगड फेक करून घरांचा दरवाजा व इतर साहित्याची तोडफोड केली. या घटनेची माहिती वाघोलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांना कळताच तात्काळ वरिष्ठांसह पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. 
    मुलाचे वडील वाघू मारुती धांडे ( वय ६४ वर्षे, रा.वाघोली )यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.याप्रकरणी 
 नितीन पेटकर,( वय ३१ वर्षे ).सुधीर पेटकर,(वय ३२ वर्षे), लक्ष्मण पेटकर,( वय ६० वर्षे सर्व रा.वाघेश्वर नगर, गोरे वस्ती, वाघोली )अशी अटक केलेल्या नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धांडे यांचा मुलगा व पेटकर यांची मुलगी यांच्यामध्ये मैत्रीचे नाते होते. ते पेटकर कुटुंबीयांना आवडत नव्हते. पेटकर व धांडे कुटुंबीय मध्ये या पूर्वीचा वादही होता.बुधवारी रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारे अल्पवयीन मुलगा हा दुचाकीवर गोरे वस्ती मध्ये आला.त्याचे पेटकर कुटुंबीयांशी काही कारणावरून वाद झाले.बाप व दोन्ही मुलांनी त्या मुलाला शिवीगाळ करून लाथा बुक्यानी मारहाण केली.यावरच ते थांबले नाही तर त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड व दगड घालून त्याचा खूनच केला.ही घटना कळताच वाघोली चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड तात्काळ पोलिसांच्या टीमसह घटनास्थळी पोहचले. त्यां तीन आरोपी यांना ताब्यात घेतले. सकाळी मृतांचे नातेवाईक पोलीस ठाण्यात आले.खून केलेल्या आरोपींना कडक शिक्षा करा त्यांना सोडू नका अशी त्यांची मागणी होती.वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी त्यांची समजूत घालत आरोपीना विरुद्ध कडक कारवाईचे आश्वासन दिले.वाघोली पोलीस ठाण्यातुन नातेवाईक घरी जाताना त्यांनी खून करणाऱ्या पेटकर  घरावर दगड फेक करून मोडतोड सुरू केली. यावेळी घरात कोणी नव्हते. ही घटना कळताच पोलीस तत्काळ तेथे पोहचले. त्यांनी परिस्थिती लगेच नियंत्रणात आणली.तेथे पोलीसाचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. आरोपींच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करणार असल्याची भूमिका नातेवाईकानी घेतली होती. अखेर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनावणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, सागर गोरे, पंडित डोंगरे यांनी त्या कुटुबियांची समजूत काढली. यानंतर दुपारी मृत तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
---
छायाचित्रांची ओळ :
 खुनाचा घटनेनंतर नातेवाईकांनी आरोपीच्या घरावर दगडफेक करून मोडतोड केल्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!