कवठेयमाई येथे दुचाकी टेम्पोची धडक होऊन झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू एक जखमी

9 Star News
0
शिरूर,प्रतिनीधी
        कवठेयमाई ता. शिरूर इचकेवाडी खारओढायेथे अष्टविनायक महामार्गावर दुचाकी व टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघे परप्रांतीय मजुरांचा मृत्यू झाला आहे तर एकजण किरकोळ जखमी झाला आहे.
      या अपघातात विनोद राजकरण यादव ( वय ३२ वर्ष )लाला धरमपाल यादव ( वय २५ वर्षे ) हे दोघे जण जागीच ठार झाले असून लालमन चुक्कीमल यादव ( सर्व रा. शिव ता. बभेरु जि.बांदा, उत्तर प्रदेश ) हा एक जण गंभीर जखमी झाला आहे.
लालमन चुक्कीमल यादव ( सर्व रा. शिव ता. बभेरु जि.बांदा, उत्तर प्रदेश ) याने फिर्याद दिली आहे.
          याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे आज दिनांक 2 जानेवारी दुपारी साडे अकरा दरम्यान अष्टविनायक महामार्गावरून ३ मजूर
दुचाकी नंबर MH 14 JQ 8931 वरून मंचर ता आंबेगाव हून कवठे येमाई येथे फरशी बसवण्या कामासाठी चाललेले असताना ईचकेवाडी जवळ खार ओढ्याच्या वळणावर समोरून आलेल्या चार चाकी वाहन सुपर कॅरी गाडी नं Mh 14 के क्यू 4017 व दुचाकीची यांची जोरदार धडक झाली. या अपघातात २ जण ठार झाले असून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!