शिरूर शहरात संशयावरून व्यापाऱ्यावर रोखले पिस्तूल.. तर हवेतही गोळीबाराचा प्रयत्न... व्यापारी बाल बाल बचावला... आरोपीच्या सहा तासात आवळल्या मुसक्या...

9 Star News
0
शिरूर प्रतिनिधी 
     शिरूर शहरात सरदार पेठ येथे आपल्या विरोधात इन्कम टॅक्स येथे अर्ज दिला या संशयाने व्यापाऱ्यावर पिस्तूल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न करून धमकी दिल्या प्रकरण शिरूर पोलीस स्टेशन येथे तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिरूर शहरात खळबळ उडाली आहे.
      तर पोलीस पथकाने सहा तासाच्या आत आरोपीच्या मुस्क्या आवळून जेरबद केले.
       महेंद्र मोतीलाल बोरा (वय 53 वर्ष, धंदा-किरणा दुकान, रा. सरदार पेठ, शिरूर ता शिरूर ) यांनी फिर्याद दिली आहे.
       कृष्णा वैभव जोशी (रा सरदार पेठ, शिरूर ता शिरूर जि पुणे) याच्यावर गोळीबार करणे खूनाचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
     याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे दिनांक २० जानेवारी रात्री साडेनऊच्या सुमारास
 शिरूर शहरातील मध्यवर्ती सरदार पेठ येथील स्विटी प्रोव्हीजन स्टोअर्स समोर आरोपी कृष्णा जोशी दारूच्या नशेत तेथे येऊन व्यापारी महेश बोरा यांना आमच्या विरोधात इन्कम टॅक्सला सुमारे चार वर्षापूर्वी अर्ज केला असे म्हणत हुज्जत घालत जर्किंग मधून एक पिस्तूल बाहेर काढून व्यापारी महेश यांच्या छातीवर रोखून मी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत पिस्तूलचा खटका दाबत असताना त्याच वेळेस व्यापाऱ्याने त्याचा हात तत्परतेने बाजूला ढकलला याच वेळेस बंदुकीची गोळी खाली पडली. व तेथून आरोपी कृष्णा जीवे मारण्याची धमकी देत पळून गेला. 
       घटनेनंतर व्यापारी महेश बोरा यांनी पोलिसांना फोन केला. पोलीस तात्काळ पोलीस घटनास्थळी येऊन जिवंत काडतूस जप्त करून पंचनामा केला. 
       याबाबत व्यापारी महेश बोरा यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने आरोपी विरोधात खुनाचा प्रयत्न व हत्यार कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
        या गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण करीत आहे.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!