शिरुर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे दोन संचालक अपात्र

9 Star News
0
शिरुर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे दोन संचालक अपात्र

शिरुरच्या सहाय्यक निबंधकांनी दिले दोघांच्या अपात्रतेचे आदेश
शिरूर 
( प्रतिनिधी ) शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था जिल्ह्यात सर्वात जास्त उलाढाल असणाऱ्या शिक्षक पतसंस्थेचे काही संचालक बेजबाबदारपणे वागत असल्याने बेजबाबदार वागणाऱ्या तसेच कर्ज थकबाकी असणाऱ्या व सभेला गैरहजर राहणाऱ्या दोन संचालकांना अपात्र करण्याची मागणी पतसंस्थेचे सभासद शंकर शिंदे यांनी केलेली असताना शिरुरचे सहाय्यक निबंधक यांनी अखेर शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक बबन संपत म्हाळसकर व नंदकिशोर निवृत्ती पडवळ या दोघांना अपात्र ठरवले आहे.

                  शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था जिल्ह्यात सर्वात जास्त उलाढाल असणारी शिक्षक पतसंस्था असून सदर पतसंस्थेचे काही संचालक कर्ज थकबाकीदार असून सभेचे नोटीस मिळून देखील सभेंना तीन पेक्षा जास्त वेळ गैरहजर राहत असल्याचा तसेच संचालक स्वतः थकबाकीदार असून मासिक सभांनाही अनुपस्थित असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता सर्वसामान्य सभासदांना कर्ज वसुलीसाठी नोटिसा पाठवण्यात आल्या असल्याचे वार्षिक अहवालावरून समोर आल्याचे म्हणत सदर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करत बबन म्हासळकर व नंदकिशोर पडवळ या दोन संचालकांना अपात्र करण्याची मागणी शंकर मल्हारी शिंदे यांनी शिरुर तालुका सहाय्यक निबंधक अरुण साकोरे यांच्याकडे केली होती. याबाबत सहाय्यक निबंधक यांनी सुनावणी घेत अखेर निर्णय जाहीर केलेला असताना शिरूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक बबन संपत म्हाळसकर व नंदकिशोर निवृत्ती पडवळ यांचे संचालक पद बंद करण्याचा आदेश सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरूर यांनी देत दोघे संचालक पुढील पाच वर्ष कोणत्याही प्रकारे संचालक होण्यास अपात्र असल्याचे घोषित केले असल्याने संस्थेच्या ९४ वर्षाच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला असल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!