संक्रांतीचा सण..बालगोपाळांची उडालेली झुंबड..विविधरंगी पतंगींची आकाशाला गवसणी घालायला लागलेली स्पर्धा..अन नातेसंबंधांचे धागे तुटुन अनाथपण नशिबी आलेल्या त्या बालकांना विश्वास व हिंमत देणारा तो पतंगीचा दोर..
मकरसंक्रांतीनिमीत्त आयोजित केलेल्या भुमीपुत्र प्रतिष्ठाणच्या पतंग मोहत्सवाचे.
अनाथांची माय पद्मश्री स्व सिंधुताई सपकाळ यांच्या मनशांती छात्रालयातील मुलांसाठी आयोजित केलेल्या पतंग महोत्सवास आज उस्फूर्त प्रतिसाद लाभला 'माईनगरी' या संस्थेच्या निसर्गरम्य परिसरात झालेल्या या मोहस्तवात पतंग उडविताना ही मुले अक्षरशः हरखुन गेली होती
शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी या सोहळ्याचे औपचारिक उद्घाटन केले
संस्थेचे व्यवस्थापक विनय सपकाळ,सिमा सपकाळ,उद्योजक सागर नरवडे,योगेश जामदार,अविनाश जाधव आदी यावेळी उपस्थित होते
भुमीपुत्र प्रतिष्ठाण चे अध्यक्ष सुशांत कुटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले
मनशांती छात्रालयाचे व्यवस्थापक विनय सपकाळ यांनी उपस्थितांचे ऋण व्यक्त केले.