पतीच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या – पतीवर गुन्हा
( प्रतिनिधी ) सणसवाडी ता. शिरुर येथील महिलेला वडील जमिनीच्या हक्कासोड नंतर देणार असलेले पैसे मागण्यासाठी पतीने पत्नीचा छळ केल्याने महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे महिलेच्या पतीविरुद्ध आम्हत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून विजय भाऊसाहेब विधाटे असे महिलेच्या पतीचे नाव आहे.
सणसवाडी ता. शिरुर छाया विधाटे यांच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या जमिनीचे सर्व मुलींकडून हक्कसोड पत्र करुन घेत मुलींना काही पैसे देणार असल्याचे सांगितले होते, त्यांनतर छाया यांचा पती विजय वारंवार पत्नीला वडिलांकडून हक्कसोडचे पैसे मागवून घे, असे म्हणत वारंवार शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करुन छळ करत असल्याबाबत छाया यांनी त्याच्या बहिण व भावाला सांगितले होते, त्यांनतर विजयकडून नेहमीच छळ सुरु असल्याने छाया विजय विधाटे वय ४० वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, याबाबत मयत महिलेची बहिण जया संजय गवळी वय ३६ वर्षे रा. घोडेगाव ता. नेवासा जि. अहिल्यानगर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी विजय भाऊसाहेब विधाटे याच्या विरुद्ध पतीविरुद्ध आम्हत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे.