शिरूर नगर परिषद व शिरूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने शिरूर शहरातील अवैध प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करत ७५ हजार रुपयांचा दंड तर ६४ कीलो प्लास्टिक जप्त केला असल्याची माहिती शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली आहे.
शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रितम पाटील व पोलिस निरिक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ३० रोजी शिरूर नगरपरिषद हद्दीत असणाऱ्या दुकानांमध्ये प्लॅस्टिक बंदी बाबत दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यामध्ये सदर ठिकाणी जाऊन दुकानांची तपासणी करून १२० मायक्रॉन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टीक आढळून आलेल्या दुकानांवर कारवाई करून एकूण ७५ हजार रुपये एवढा दंड वसूल करण्यात आला. तर ६४ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आले.
सदर कार्यवाही शिरूर नगरपरिषदेचे स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता आदित्य बनकर, स्वच्छता निरिक्षक दत्तात्रय बर्गे तसेच स्वच्छता मुकादम मनोज अहिरे, सागर कांबळे, सफाई कर्मचारी मयूर जाधव, गणेश शेंडगे, रमेश चव्हाण, वामन जाधव.राणी गव्हाणे, इंदुबाई मोरे, विद्या म्हस्के शितल घारु, काळूराम आसवले, पोलिस अंमलदार मनीषा फंड व रघु हळनोर या पथकाचे केली आहे.